वर्धा: आईसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाचा,अल्पवयीन मुलाने केला खून
वर्धा येथील जळगांव जवळील एका गावात आईचे अनैतिक संबंध समजल्यावर चिडलेल्या अल्पवयीन मुलाने 28वर्षीय तरुणाची कुऱ्हाडीने वार करत निर्घृण पद्धतीने हत्या केली.
वर्धा (Wardha) येथील जळगांव (Jalgaon) जवळील एका गावात आईचे अनैतिक संबंध समजल्यावर चिडलेल्या अल्पवयीन मुलाने 28 वर्षीय तरुणाची निर्घृण पद्धतीने हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. Times of India ने दिलेल्या वृत्तानुसार आपल्या आईचा प्रियकर नितीन गोमासे वर या अल्पवयीन मुलाने कुऱ्हाडीने वार करत त्याचा खून केला व नंतर शेजारील शेतात त्याचे प्रेत फेकून दिल्याचे समजतेय. शनिवारी सकाळी मृत नितीनचे शरीर शेतात सापडल्यावर या घटनेचा खुलासा झाला.
सूत्रांच्या माहितीनुसार आपली आई आणि नितीन गोमासे हे घरी कोणी नसताना लपून भेटायचे व मद्यपान करायचे असे या लहान मुलाला समजले. आपल्या आईच्या या वागण्याने नाराज झालेल्या मुलाने आई व नितीन दोघांना समजावत एकमेकांपासून लांब राहा असं सांगण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र त्या दोघानीही आपल्या बोण्याकडे दुर्लक्ष केल्याने या मुलाला आणखीनच राग आला. या रागातूनच त्याने नितीनला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला व आपल्या प्लॅन प्रमाणे त्याला दारू प्यायला घरी बोलावून शुक्रवारी रात्री त्याच्यावर धारदार कुऱ्हाडीने वार केला. सेक्स करण्यात अडथळा येत असल्याने आई-वडीलांनीच घेतला दीड महिन्याच्या बाळाचा जीव
ही घटना झाल्यावर या मुलाने याबाबत आपल्या वडिलांना कळवले व एकमेकांच्या मदतीने या बापलेकाने मृत नितीनच्या प्रेताचा बंदोबस्त करायचा देखील प्लॅन आखला. शुक्रवारी खून केल्यावर रात्री उशिरापर्यंत हे मृत शरीर त्यांनी घरातच ठेवले व मध्यरात्रीच्या सुमारास शेजारच्या शेतात फेकून दिले, शनिवारी सकाळी शेतात कामासाठी गेलेल्या महिलेला याचा पत्ता लागल्यावर तिने पोलिसांना कळवलं. यानंतर तीन तासातच पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला व त्याच्या वडिलांना तातडीने अटक केली. नितीनचा मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठविण्यात आला आहे.