औरंगाबादमध्ये तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार
औरंगाबादमध्ये तेरा वर्षीय मुलीने पाणी देण्याच्या बहाण्याने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
औरंगाबादमध्ये तेरा वर्षीय मुलीने पाणी देण्याच्या बहाण्याने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेतील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कालिकानगर येथील एका विवाहित महिलेने तिच्या प्रियकराला घरी बोलावले होते. तसेच या प्रियकराला पाणी देण्यासाठी बाजूला राहणाऱ्या या पीडित मुलीला पाठवले. त्याचवेळी या महिलेने ती मुलगी पाणी देण्यासाठी गेलेल्या खोलीचे बाहेरुन दाराला कुलुप लावून घेतले. तर ही महिला त्या खोलीच्या येथून पसार झाली. त्याचवेळी खोलीत असलेल्या प्रियकराने या तेरा वर्षीय तरुणीवर अत्याचार केला.
या घटनेने पीडित मुलीच्या घरच्यांनी पोलिसात आरोपी महिला आणि तिच्या प्रियकाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र या आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.