Mumbai: ऑनलाइन फसवणूक झालेल्या महिलेचा दावा, ओटीपी न सांगुनही खात्यातून लाखो रुपये गायब
महिलेने पोलिसांना सांगितले की, ती महाविद्यालयीन विद्यार्थिनी असून तिचे वडील कापड व्यापारी आहेत.
मुंबईत (Mumbai) सायबर फसवणुकीची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका ऑनलाइन फसवणुकीत (Online Fraud) 3.63 लाख रुपये गमावलेल्या एका 25 वर्षीय महिलेने पोलिसांसमोर दावा केला की, तिला एका फसवणुकीचा फोन आला की तो बँकेच्या अधिकाऱ्याकडून बोलत आहे. संभाषणादरम्यान, त्याने वन टाईम पासवर्ड (OTP) मागितला, परंतु महिलेने कधीही त्याच्याशी कोणतीही माहिती शेअर केली नाही की तरीही तिच्या खात्यातून पैसे कापले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पोलीस ठाण्यात 30 मार्च रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता. महिलेने पोलिसांना सांगितले की, ती महाविद्यालयीन विद्यार्थिनी असून तिचे वडील कापड व्यापारी आहेत.
पीडितेने सांगितले की तिचे पंजाब नॅशनल बँकेत बँक खाते आहे आणि तिचा एअरटेल क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे. 29 मार्च रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तिला दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून कॉल आले. त्या व्यक्तीने सांगितले की तो बँकेतुन बोलत आहे आणि त्याच्याकडे बँक खाते क्रमांकासारखे सर्व बँकिंग संबंधित तपशील आहेत. यानंतर त्या व्यक्तीने ओटीपी मागितला. (हे देखील वाचा: गिरगाव चौपाटीतील दर्शक गॅलरीवरुन आमदार Nitesh Rane यांचा पर्यावरणमंत्री Aaditya Thackeray यांच्यावर निशाणा; BMC आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र लिहून कारवाईची मागणी)
महिलेच्या खात्यातून 3.63 लाख रुपये उडवले
मात्र, महिलेला संशय आला आणि तिने कॉल डिस्कनेक्ट केला, त्यानंतर त्या व्यक्तीने तिला अनेक वेळा कॉल केला. त्यानंतर त्याने तिला वेगळ्या नंबरवरून व्हॉट्सअॅपवर कॉल केला आणि विचारले की तुमचा नंबर नेट बँकिंग खात्याशी लिंक आहे का? महिलेने माहिती केल्यावर त्याने पुन्हा ओटीपी मागितला, ज्यावरून महिलेने पुन्हा कॉल डिस्कनेक्ट केला. त्याच दिवशी, रात्री 8 च्या सुमारास त्यांना त्यांच्या बँकेतून दोन संदेश आले की दोन व्यवहारात त्यांच्या खात्यातून 3.63 लाख रुपये काढले गेले. महिलेने दुसऱ्या दिवशी तिच्या बँकेत तक्रार केली आणि नंतर पोलिसांशी संपर्क साधला.