MHT CET PCM & PCB Results 2020: पीसीएम आणि पीसीबी सीईटी परीक्षांचे निकाल आज होणार जाहीर, कसा पाहाल निकाल

PCM (Physics, Chemistry, and Maths) आणि PCB (Physics, Chemistry, and Biology) या दोन शाखेतील प्रवेश परीक्षांचे निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर झाले आहे.

Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash.com)

MHT CET PCM & PCB Results 2020: राज्यभरात घेण्यात आलेल्या PCM आणि PCB शाखेकरिता प्रवेश परीक्षांचे निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. cetcell.mahacet.org या संकेतस्थळांवर (Website) तुम्हाला या परीक्षांचे निकाल पाहता येतील. PCM (Physics, Chemistry, and Maths) आणि PCB (Physics, Chemistry, and Biology) या दोन शाखेतील प्रवेश परीक्षांचे निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर  झाले आहेत. राज्यात झालेल्या या परीक्षांचे निकाल वर येथे पाहता येतील.

हे निकाल तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. हे पाहण्यासाठी पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करा

हे निकाल पाहण्यासाठी MAHACET च्या cetcell.mahacet.org. या संकेतस्थळाला भेट द्या

2. त्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या तक्त्यातील MHT CET Result 2020 या पर्यायावर क्लिक करा. हेदेखील वाचा- MAH BHMCT CET Result 2020 Declared: हॉटेल मॅनेजमेंट सीईटी परीक्षांचे निकाल जाहीर, cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी काय कराल?

3. त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. तेथे विद्यार्थ्याने आपली Login डिटेल्स भरावे.

4. त्यानंतर Submit वर क्लिक केल्यास तुमचा निकाल तुम्हाला पाहता येईल.

5. निकाल पाहिल्यानंतर तो तुम्ही डाऊनलोडही करू शकता.

दरम्यान यंदा एमएचटी सीईटीचा निकाल 5 डिसेंबरला लागणार असल्याचं जाहीर केले आहे. या दिवशी इंजिनियरिंगच्या (Engineering) विद्यार्थ्यांसोबतच लॉ (Law)आणि BEd अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे देखील निकाल जाहीर केले जाणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून दिली आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना cetcell.mahacet.org किंवा mhtcet2020.mahaonline.gov.in. या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल तर केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल. अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.