MHADA: मुंबई, कोकण मंडळातील म्हाडा दुकांनाची सोडत 1 जूनला

जो ग्राहक दुकानाला अधिक बोली लावेल त्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल. म्हाडाने 168 दुकानांसाठी 2010 मध्येच जाहीरात दिली होती. त्यानंतर तब्बल 9 वर्षांनी या दुकांनासाठी सोडत निघाली आहे.

मुंबई म्हाडा लॉटरी 2018 Photo Credit : PTI

MHADA Shops Lottery: मुंबई (Mumbai) आणि कोकण (Konkan) मंडळातील म्हाडा दुकानांची सोडत अखेर 1 जून रोजी करण्याचे नक्की झाले आहे. दोन्ही मंडळांची मिळून 274 दुकानांची सोडत गेली 9 वर्षे रखडली होती. प्रदीर्घ काळानंतर अखेर त्याला मुहूर्त मिळाला आहे. दरम्यान, या दुकानांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत 27 मे पर्यंत आहे. 30 मेर रोजी या दुकानांसाठी ई-टेंडर प्रसिद्ध झाले आहे. दुकानांसाठी ऑनलाईन बोली लावण्यात येणार असून, 31 मे रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत ही बोली खुली राहणार आहे.

प्राप्त माहितीनुसार, या दुकानांसाठी ऑनलाईन बोली लावण्याची अंतिम मुदत 27 मे पृर्यंत आहे. या दुकानांमध्ये रुची असणाऱ्या नागरिकांना जाहीरात पाहून नोंदणी करणे, ऑनलाईन अर्ज, कागदपत्र डाउनलोड करणे यांसारख्या तांत्रिक बाबी पूर्ण करता याव्यात यासाठी म्हाडाने ही मुदत 27 मे पर्यंत ठेवली आहे. जो ग्राहक दुकानाला अधिक बोली लावेल त्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल. म्हाडाने 168 दुकानांसाठी 2010 मध्येच जाहीरात दिली होती. त्यानंतर तब्बल 9 वर्षांनी या दुकांनासाठी सोडत निघाली आहे. (हेही वाचा, म्हाडा लॉटरी मधील 217 घरांसाठी मुदतवाढ, 24 मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार)

म्हाडाची दुकाने कोणत्या ठिकाणी?

मुंबई मंडळ

कोकण मंडळ

दरम्यान, ज्या अर्जदार नागरिकास ग्राहक म्हणून म्हाडाचे दुकान घ्यायचे आहे. त्या अर्जदारास दुकानांच्या किंमतीच्या एकूण एक टक्के रक्कम अनामत रक्कम म्हणून भरावी लागेल. त्यानंतर त्या ग्राहकाला म्हाडाच्या नियमानुसार कायदेशीर तरतुदींचे पालन करुन दुकानांचा ताबा देण्यात येईल.