MHADA Mumbai Board Lottery Results 2019: मुंबई मधील 217 घरांसाठी सोडत निकाल आज 10 वाजता जाहीर होणार, lottery.mhada.gov.in येथे पाहा विजेत्यांची यादी

तर वांद्रे (Bandra) येथील म्हाडा भवनात हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : Facebook)

MHADA House 2019 Mumbai Board Lottery: आज मुंबई (Mumbai) मधील म्हाडाच्या (MHADA) 217 घरांसाठी सोडत निकाल सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणार आहे. तर वांद्रे (Bandra) येथील म्हाडा भवनात हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. मुंबईसाठी म्हाडाने काढलेल्या घरांसाठी जवळजवळ 66 हजार अर्ज पात्र ठरले आहेत.

तर लोकसभा निवडणूकांमुळे मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिक या शहरांतील घरांची लॉटरी निकाल पुढे ढकलण्यात आले. काही दिवसांपूर्वी नाशिक येथील निकाल जाहीर झाल्यावर आज मुंबईतील म्हाडाच्या 217 घरांसाठी लॉटरी निकाल जाहीर होणार आहे.

30 मे रोजी मुंबई म्हाडाच्या पात्र अर्जदारांची यादी जाहीर करण्यात आली होती. तर घराच्या भाग्यवान विजेत्यांची नावे आज सकाळी 10 वाजल्यापासून सांगण्यात येणार आहे.

(MHADA Mumbai Board Lottery 2019: मुंबईतील 217 सदनिकांसाठी सोडत, म्हाडा भवनात निकाल जाहीर होणार)

मुंबईतील 217 घरांसाठी सोडत

मुंबई म्हाडा घरं सोडत दिनांक - 2 जून 2019

>वेळ - सकाळी 10 वाजल्यापासून

>कुठे निघणार सोडत - म्हाडा भवन, वांद्रे

>ऑनलाईन यादी पाहण्यासाठी -lottery.mhada.gov.in

>थेट प्रक्षेपणासाठी http://mhada.ucast.in येथे क्लिक करा.

कशी पहाल भाग्यवान विजेत्यांची यादी

>lottery.mhada.gov.in ओपन करा.

>या संकेतस्थळावर तुम्ही ज्या ठिकाणी लॉटरीच्या घराचा अर्ज भरला आहे त्यावर क्लिक करा.

>मेन्यु बार वर तुम्हांला Lottery Result वर क्लिक करा.

>त्यानंतर लॉटरी रिझल्टची लिंक ओपन होईल.

>तुमच्या स्कीम नंबर आणि कॅटेगरीनुसार भाग्यवान विजेत्यांची आणि प्रतीक्षेत असल्याची यादी पाहता येईल.

अर्जदाराच्या अर्जाचा क्रमांक हाच लॉटरी जनरेशन क्रमांक असेल. त्यापुढे पात्र अर्जदारांच्या कागदपत्राची छाननी केली जाईल तर अपात्र उमेदवारांना रिफंड दिले जाणार आहेत.



संबंधित बातम्या

ZIM vs AFG 1st ODI 2024 Preview: अफगाणिस्तान क्रिकेट संघ पहिल्या वनडेत झिम्बाब्वेशी भिडणार; सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील जाणून घ्या

PAK vs SA 1st ODI 2024 Mini Battle: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिल्या वनडेच्या मिनी बॅटलमध्ये होणार चुरशीची स्पर्धा, हे खेळाडू सामन्याचा निर्णय बदलू शकतात

Adani Power Plant Contract: मुंबई उच्च न्यायालयाने अदानी पावर विरोधात दाखल याचिका फेटाळली; याचिकाकर्त्यांला ठोठावला 50 हजारांचा दंड

PAK vs SA 1st ODI 2024 Preview: पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला एकदिवसीय सामना पार्लमध्ये खेळला जाणार, सामन्यापूर्वी हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंगसह सर्व तपशील घ्या जाणून