MHADA Mumbai Board Lottery 2019: मुंबईतील 217 सदनिकांसाठी उद्या सोडत, म्हाडा भवनात निकाल जाहीर होणार

मुंबईत आपल हक्काच घर असावे असे प्रत्येकाला वाटते. तर यंदा तुम्ही म्हाडाकडून मुंबईत घर घेण्यासाठी अर्ज केला असल्यास उद्या (2 जून) 217 सदनिकांसाठी सोडतीचा निकाल सकाळी 10 वाजल्यापासून जाहीर होणार आहे.

Mhada Lottery | (Photo credit: archived, edited, representative image)

MHADA House 2019 Mumbai Board Lottery: मुंबईत आपल हक्काच घर असावे असे प्रत्येकाला वाटते. तर यंदा तुम्ही म्हाडाकडून मुंबईत घर घेण्यासाठी अर्ज केला असल्यास उद्या (2 जून) 217 सदनिकांसाठी सोडतीचा निकाल सकाळी 10 वाजल्यापासून जाहीर होणार आहे. या घरांसाठी जवळजवळ 66 हजार अर्ज पात्र ठरले आहेत.

यापूर्वी मुंबईमधील 217 घरांसाठी लॉटरी ही 21 एप्रिल रोजी जाहीर होणार होती. परंतु निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू केल्याने त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. या घरांसाठी 78 हजार 773 अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु 66 हजार 99 अर्ज या घरांसाठी पात्र ठरले आहेत. तर लॉटरीमध्ये शेल टॉवर चेंबूर आणि कोपरी-पवई मधील 217 घरांची सोडत उद्या 10 वाजल्यापासून जाहीर होणार आहे.

मुंबईतील 217 घरांसाठी सोडत

>मुंबई म्हाडा घरं सोडत दिनांक - 2 जून 2019

>वेळ - सकाळी 10 वाजल्यापासून

>कुठे निघणार सोडत - म्हाडा भवन, वांद्रे

>ऑनलाईन यादी पाहण्यासाठी -lottery.mhada.gov.in

कशी पहाल भाग्यवान विजेत्यांची यादी

>lottery.mhada.gov.in ओपन करा.

>या संकेतस्थळावर तुम्ही ज्या ठिकाणी लॉटरीच्या घराचा अर्ज भरला आहे त्यावर क्लिक करा.

>मेन्यु बार वर तुम्हांला Lottery Result वर क्लिक करा.

>त्यानंतर लॉटरी रिझल्टची लिंक ओपन होईल.

>तुमच्या स्कीम नंबर आणि कॅटेगरीनुसार भाग्यवान विजेत्यांची आणि प्रतीक्षेत असल्याची यादी पाहता येईल.

(MHADA Mumbai Board Lottery 2019: मुंबई मध्ये 217 म्हाडा घरांसाठी 2 जूनला निघणार लॉटरी; lottery.mhada.gov.in वर जाहीर होणार विजेत्यांची यादी)

तर आज म्हाडाच्या 276 दुकानांसाठी ई-लिलाव होणार असून मुंबई मंडळाअंतर्गत पार पडणार आहे. त्यामध्ये प्रतीक्षानगर, न्यू हिंद मिल-माझगाव, विनोबा भावेनगर-कुर्ला, स्वदेशी मिल-कुर्ला, तुर्भे मंडाले-मानखुर्द, तुंगा पवई, गव्हाणपाडा-मुलुंड, मजासवाडी-जोगेश्वरी, शास्त्रीनगर-गोरेगाव, सिद्धार्थनगर-गोरेगाव, चारकोप, मालवणी- मालाड येथील २०१ गाळ्यांचा समावेश आहे.

अर्जदाराच्या अर्जाचा क्रमांक हाच लॉटरी जनरेशन क्रमांक असेल. त्यापुढे पात्र अर्जदारांच्या कागदपत्राची छाननी केली जाईल तर अपात्र उमेदवारांना रिफंड दिले जाणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement