Mhada Lottery: म्हाडा लवकरच 11 हजार घरांसाठी काढणार लॉटरी

येत्या दोन ते तीन दिवसात म्हाडाकडून यासंदर्भात जाहिरात काढण्यात येणार आहे.

Mhada | (Photo credit: archived, edited, representative image)

म्हाडा मुंबई कोकण विभागात 11 हजार घरांसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ज्यांना मुंबई आणि ठाणे यासारख्या शहरांत घरं हवंय, अशा नागरिकांचं स्वप्न आता पूर्ण होणार (Mhada Houses In Mumbai) आहे. सामान्य माणसाला मुंबईसारख्या शहरात घरं विकत घेण्याचे स्वप्न यामुळे आता शक्य होणार आहे. म्हाडाकडून प्रथमच मुंबई आणि कोकण विभागासाठी मोठ्या प्रमाणावर घरांची जाहिरात काढली जाणार (Mhada Lottery) आहे. मुंबईत दोन हजारांसाठी तर कोकण मंडळाकडून तब्बल 9 हजार घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. (हेही वाचा - MHADA Pune Lottery Draw Result 2024: म्हाडा पुणे विभागातील घरांची लॉटरी housing.mhada.gov.in वर पहा ऑनलाईन!)

मुंबईसह कोकण विभागातील तब्बल अकरा हजार नागरिकांचं घराचं स्वप्न साकार होणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात म्हाडाकडून यासंदर्भात जाहिरात काढण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वीच घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. म्हाडा प्रत्येक वर्षी विविध भागांमध्ये लॉटरी काढत असते.

म्हाडाच्या घरांची जाहिरात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच काढण्यात येणार असल्याचं समोर आलंय. घरांची संपूर्ण प्रक्रिया आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पूर्ण करण्याचं म्हाडाने नियोजन केल्याची माहिती मिळते. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांतच म्हाडाच्या घरांची सोडतीची जाहिरात काढण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वीच नागरिकांना घराचा ताबा मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.