MHADA Lottery Draw Results Dates: नाशिक मधील म्हाडाची लॉटरी आज होणार जाहीर , महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यातील लॉटरीच्या तारखाही जाहीर

म्हाडाच्या लॉटरी आज नाशिकमध्ये(Nashik) , २ जूनला मुंबई(Mumbai), ४ जूनला औरंगाबाद (Aurangabad) विभाग आणि ७ जूनला पुणे (Pune) जाहीर होईल.

MHADA Lottery (Photo Credit : PTI)

MHADA Lottery Draw Results 2019: तुमच्या बजेटमध्ये येणारं असं तुमचे स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पुर्ण करणारी सरकारची एकमेव योजना म्हणजे म्हाडा लॉटरी(Mhada Lottery). ह्या म्हाडाकडून जाहीर करण्यात आलेल्या मुंबई, औरंगाबाद, पुणे आणि नाशिक विभागातील सोडतींच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी म्हाडाच्या या विभागातील एकूण ७ हजार १०३ घरांच्या सोडतीची घोषणा केली आहे. यानुसार आज नाशिकमध्ये(Nashik) , २ जूनला मुंबई(Mumbai), ४ जूनला औरंगाबाद (Aurangabad) विभाग आणि ७ जूनला पुणे (Pune) विभागातील सोडत निघणार आहे.

गेल्या 2 महिन्यांपासून सुरु झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात म्हाडाकडून या सोडतीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. तसेच म्हाडाचे बहुतांश अधिकारी निवडणुकीच्या ड्युटीवर होते. मात्र बहुप्रतिक्षित असलेल्या म्हाडा लॉटरीच्या सोडतीची तारीख म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी जाहीर केली आहे. म्हाडाच्या एकूण लॉटरी पैकी नाशिकमधील म्हाडाच्या घरांसाठी कमी प्रतिसाद पाहायला मिळाल. येथील एक हजार २१३ घरांसाठी केवळ २ हजार ६१९ जणांचे अर्ज दाखल झाले.

तर मुंबईतील घरांना चांगलाच प्रतिसाद मिळाला. मुंबईत २१७ घरांसाठी तब्बल ६६ हजार अर्ज दाखल झाले होते. यातील नशीबवान विजेत्यांची नावे २ जूनला जाहीर केली जाणार आहेत. औरंगाबादमध्ये म्हाडाकडून ९१७ घरांसाठी ७ हजार ३३७ जणांनी अर्ज केले असून याची लॉटरी ४ जूनला जाहीर केली जाणार आहे.

MHADA: मुंबई, कोकण मंडळातील म्हाडा दुकांनाची सोडत 1 जूनला

तर दुसरीकडे मुंबई आणि कोकणातील 274 गाळ्यांचा लिलावही ऑनलाईन पद्धतीने 29 ते 31 मे दरम्यान होणार आहे. 1 जूनला याची लॉटरी जाहीर केली जाईल. यामध्ये मुंबईत 197 तर कोकणात 77 गाळ्यांचा समावेश आहे.