Mhada Mumbai Lottery 2022: अत्यल्प उत्पन्न गटासाठी दोन हजार घरे, मुंबईत 4 हजार घरांसाठी म्हाडा लॉटरी; घ्या अधिक जाणून

पाठीमागील जवळपास तीनएक वर्षांपासून मुंबईकर म्हाडा (MHADA Houses) घरांच्या सोडतीच्या प्रतिक्षेत आहेत. मुंबईकरांची ही प्रतिक्षा लवकरच समाप्त होणार आहे. कारण म्हाडा (MHADA) घरांसाठी लवकरच सोडत निघणार आहे. प्राप्त माहितीनुसार यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात जवळपास 4 हजार घरांसाठी म्हाडा लॉटरी (MHADA Lottery) निघणार आहे.

Mhada Fraud Warning | (Photo credit: archived, edited, representative image)

पाठीमागील जवळपास तीनएक वर्षांपासून मुंबईकर म्हाडा (MHADA Houses) घरांच्या सोडतीच्या प्रतिक्षेत आहेत. मुंबईकरांची ही प्रतिक्षा लवकरच समाप्त होणार आहे. कारण म्हाडा (Mhada Mumbai Lottery 2022) घरांसाठी लवकरच सोडत निघणार आहे. प्राप्त माहितीनुसार यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात जवळपास 4 हजार घरांसाठी म्हाडा लॉटरी (MHADA Lottery) निघणार आहे. त्यामुळे म्हाडा घरांच्या सोडतीकडे डोळे लावून बसलेल्या मुंबईकरांना (Mumbai MHADA) यंदा गिफ्ट मिळणार आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये घर घरेदी ही सर्वासामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहोचली असताना म्हाडा एक दिलासा ठरतो. कारण राज्य सरकार म्हाडाच्या रुपात सर्वसामान्यांसाठी परवडतील अशा दरांमध्ये घरं खरेदीसाठी उपलब्ध करुन देत असते.

दरम्यान, जुलै महिन्यात लॉटरी निघणारी म्हाडाची घरे ही गोरेगाव डोंगर परिसरात असतील. एकुण 4000 घरांपैकी बहुतांश घरं ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. ही घरे 'वन रुम किचन' या प्रकारात मोडणारी असतील. जवळपास 23 मजल्यांच्या सात इमारतींमध्ये सुमारे 1239 घरं उपलब्ध असतील. या घरांसबतच उन्नतनगर क्रमांक-2 येथेही ही घरे अत्यल्प उत्पन्न गटासाठी असतील त्यांचा आकडा 708 इतका आहे. याच ठिकाणी अल्प उत्पन्न गटासाठी असणारी घरे 736 आहेत. तर मध्यम उत्पन्न गटासाठी 227 राखून ठेवलेली असतील. उच्च उत्पन्न गटामध्ये 105 घरांचा समावेश आहे. गोरेगावसोबतच म्हाडाकडून अँटॉप हिल, कन्नमवारनगर आणि दक्षिण मुंबई परिसरांचाही सोडतीत समावेश असेल.म्हाडाद्वारे या परिसरात जवळपास 1,000 घरे उपलब्ध करुन दिली जातील. (हेही वाचा, MHADA Exam Revised Timetable: म्हाडा सरळसेवा नोकरभरतीसाठी परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर; इथे पहा वेळापत्रक)

म्हाडाने मुंबईकरांसाठी यापूर्वी अनेक सोडती काढल्या. मात्र या वेळी म्हाडाची सोडत ही मुंबईकरांसाठी काहीसी खास असणार आहे. कारण, कोरोना व्हायरस महामारीचे सावट आणि त्यात अडकलेली एकूण यंत्रणा. या पार्श्वभूमीवर पाठीमागील तीन वर्षांपासून म्हाडाने घरांची सोडतच काढली नव्हती. त्यामुळे म्हाडाची या वेळची सोडत काहीशी विशेष ठरु शकते. याशिवाय या वेळच्या सोडतीत विविध उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे असणार आहेत. त्यामुळे सर्व स्तरातील नागरिकांना घरे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now