MHADA Lottery Update: म्हाडाचे घर घेताय? जाणून घ्या खूशखबर!, 13 डिसेंबरला सोडत, पण 'ही' आहे खरी अपडेट
म्हाडा घरांसाठी अर्जविक्री- स्वीकृती मुदत एक महिन्यांनी वाढविण्यात आली. ज्यामुळे नागरिकांना आता या लॉटरीसाठी अनामत रकमेसह येत्या 18 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या लॉटरीची सोडत येत्या 13 डिसेंबरला निघणार आहे.
MHADA Lottery Updates: म्हाडाचे घर खरेदी करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. म्हाडा कोकण गृहनिर्माण मंडळ (MHADA Konkan Division Houses Lottery) द्वारा 311 सदनिकांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे. ही लॉटरी ठाणे शहर आणि ठाणे जिल्हा, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सदनिकांसाठी आहे. या सोडतीला नागरिकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. परिणामी अर्जविक्री- स्वीकृती मुदत एक महिन्यांनी वाढविण्यात आली. ज्यामुळे नागरिकांना आता या लॉटरीसाठी अनामत रकमेसह येत्या 18 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या लॉटरीची सोडत येत्या 13 डिसेंबरला निघणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, म्हाडा कोकण मंडळाच्या या लॉटरीसाठी सप्टेंबर महिन्यात जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या जाहिरातीनुसार, अर्जविक्री आणि स्वीकृती 15 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. दरम्यान, RTGS, NEFT यांद्वारे अनामत रक्कम भरुन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 18 ऑक्टोबरला संपत होती. मात्र, नागरिकांनी केलेल्या अर्जांची संख्या पाहता या सोडतीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. परिणामी 10 हजार अर्जांचा टप्पा पाह होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळेअर्जविक्री आणि स्वीकृतीस मुदतवाढ मिळावी यासाठी कोकण मंडळानं म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे कोकण मंडळाने प्रस्ताव दिला होता. ज्याला उपाध्यक्षांकडून मंजूरी मिळाळी आहे.
पंतप्रधान आवाज योजनेंतर्गत म्हाडाने विरार-बोळिंज येथे सदनिका उभारल्या आहेत. मात्र, त्याला नागरिकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींचाही सामनाही करावा लागत असल्याने म्हाडा चिंतेत आहे. त्यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने म्हाडा प्रशासन कामाला लागले असून अर्ज स्वीकृती-अर्जविक्रीस मुदतवाढ द्यावी असा तोडगा काढण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांना या प्रकल्पाबाबत माहिती मिळावी यासाठी विविध माध्यमातून जाहिरात आणि जनजागृती करणार येणार असल्याचे समजते.
कशी असेल अर्ज प्रक्रिया?
- अर्ज प्रक्रिया संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने असेल. ज्याद्वारे नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट आदी सुविधा उपलब्ध असतील.
- IHLMS 2.0 प्रमाली वापरुन अर्जदार अँड्रॉइड (Android) अथवा आयओएस (ios) या दोन्ही अँड्रॉइड प्रक्रियेद्वारे सोडतीत सहभागी होऊ शकतात.
- या प्रणालीचे ॲन्ड्रॉईड व्हर्जनच्या मोबाईलमध्ये गूगल ड्राईव्हच्या प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोअरमध्ये उपलब्ध.
- हे व्हर्जन Mhada Housing Lottery System या नावे मोबाईल ॲप द्वारे उपलब्ध होऊ शकते.
दरम्यान, अर्जदार https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर जे की, म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर अर्जाची पूर्ण नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संकेतस्थळावरील माहितीपुस्तीकाही अनेकांसाठी मदतगार ठरु शकते, असे म्हाडाने म्हटले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Oct 16, 2023 10:03 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

