MHADA Konkan Board Lottery 2023: म्हाडाच्या कोकण विभागातील 4,654 घरांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू; 10 मे दिवशी सोडत
कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी 10 मे दिवशी ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सोडत जाहीर केली जाणार आहे.
म्हाडा कोकण मंडळाच्या (MHADA Konkan Board) 4752 घरांच्या सोडतीसाठी आज (8 मार्च) पासून अर्ज विक्री सुरू करण्यात आली आहे. या घरांसाठीची सोडत 10 मे दिवशी काढली जाणार आहे. दरम्यान या सोडती मध्ये अत्यल्प, अल्प मध्यम आणि उच्च गटामधील घरांचा समावेश आहे. या 4752 घरांपैकी 984 घरं ही पंतप्रधान आवास योजनेमधील आहेत. 1554 घरं 20% योजनेमधील आहेत तर उर्वरित घरं ही म्हाडा गृहनिर्माण योजनेमधील आहेत.
कोकण मंडळामधील या सोडतीमध्ये‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेमध्ये विरार – बोळींजमधील 2,048 घरांचा समावेश आहे. अल्प आणि मध्यम गटातील ही घरे आहेत. त्यांच्या किंमती 23 लाख ते 41 लाख रुपयांदरम्यान आहेत. या घरांसाठी 17 मार्चपासून अर्ज विक्री सुरू केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज आणि रक्कम भरून यासाठी नशीब आजमावलं जाऊ श्कातं. यासाठी 12 एप्रिलची अंतिम मुदत आहे. तर प्रारूप यादी 27 एप्रिलची आहे. अंतिम यादी 4 मे दिवशी जाहीर केली जाईल.
पंतप्रधान आवास योजनेतील अत्यल्प गटातील 340 घरे शिरढोण येथे, विरार-बोळिंज येथे 328 घरे, 256 घरे गोठेघर येथे, खोणी येथे 60 घरे अशी एकूण 984 घरे आहेत. या घरांच्या किमती 14 लाख 96 हजारांपासून ते 21 लाख याच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे.