MHADA Konkan Board Housing Lottery 2024: म्हाडा च्या कोकण विभागीय बोर्डाकडून 12,626 घरांसाठी लॉटरी जाहीर, housing.mhada.gov.in वर करा अर्ज
कोकण विभागातील म्हाडा घरांच्या लॉटरीसाठी रजिस्ट्रेशन आणि अर्ज करण्याची प्रक्रिया आज( 11 ऑक्टोबर) पासून सुरू होणार आहे. दुपारी 12.30 पासून त्याची प्रक्रिया सुरू होईल.
म्हाडा च्या Konkan Housing and Area Development Board, कडून 12,626 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.ही लॉटरी ठाणे शहर, कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्गामधील ओरस, वेंगुर्ला, मालवण या भागातील घरांसाठी आहे. या स्कीम मध्ये सुमारे 11,187 घरं ही प्रथम येणार्यास प्राधान्य या तत्त्वावर दिली जाणार आहेत. या MHADA Vice President and CEO Sanjeev Jaiswal यांच्या हस्ते या प्रक्रियेचा शुभारंभ केला जाणार आहे.
म्हाडाच्या कोकण बोर्डाची लॉटरी ही दोन भागात विभागली गेली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात 1439 युनिट्स समावेश आहे त्याची अर्ज प्रक्रिया 11 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. यासाठी Android आणि iOS devices अर्जदारांना IHLMS 2.0 app डाऊनलोड करावं लागणार आहे. ऑनलाईन माध्यमातून अर्ज करायचा झाल्यास म्हाडाची अधिकृत वेबसाईट housing.mhada.gov.in वर रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. नक्की वाचा: Pune MHADA Lottery: पुणे म्हाडातर्फे 6,294 घरांच्या विक्रीसाठी ऑनलाइन लॉटरी जाहीर; सुरु झाली नोंदणी आणि अर्जाची प्रक्रिया, जाणून घ्या घरांची श्रेणी व महत्वाच्या तारखा .
म्हाडाच्या वेबसाईट वर अर्ज करण्यासाठी बुकलेट, माहितीपत्र, व्हिडिओज उपलब्ध आहेत. कोकण विभागीय मंडळाच्या चीफ ऑफिसर Revati Gaikar यांनी दिलेल्या माहितीनुसार, रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी त्यांनी ही नीट पाहूँ मग पुढील प्रक्रिया सुरू करावी.
कोकण विभागीय मंडळातील अर्जासाठी महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची अंतिम मुदत - 10 डिसेंबर 2024 (11.59PM पर्यंत)
- Earnest Money Deposit भरण्याची वेळ - 11 डिसेंबर पासून
- प्रारूप यादी जाहीर होणार - 18 डिसेंबर 2024 (6:00 PM)
- अंतिम यादी जाहीर होणार - 24 डिसेंबर 2024
- लॉटरीचा ड्रॉ - 27 डिसेंबर
दरम्यान अर्जदारांना प्रारूप यादीवर हरकती नोंदवणयसाठी 20 डिसेंबर दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे.
म्हाडाच्या या स्कीम मध्ये 9883 युनिट्स ही Pradhan Mantri Awas Yojana अंतर्गत आहेत. तर 512 युनिट्स ही 15% Integrated Urban Housing Scheme शी जोडलेली आहेत. 661 युनिट्स 20% Comprehensive Housing Schemeआणि अधिकची 131 ही विस्थापितांसाठी आहेत.
अर्जाबाबत मदतीसाठी, म्हाडा हेल्पलाइनवर ०२२-६९४६८१०० या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)