MHADA House for Mill Workers: गिरणी कामगार कोठ्यातून म्हाडा घर लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट, Mill Worker Eligibility App द्वारे करता येणार अर्ज

अॅपचे हे व्हर्जन अॅड्रॉइड मोबाइलमधील गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोरमध्ये तो उपलब्ध आहे.

Mhada | (Photo credit: archived, edited, representative image)

Mill Worker Eligibility App for MHADA House: गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना मुंबईत म्हाडाचे घर (MHADA House for Mill Workers) हे पाठिमागील अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला विषय. अलिकडील काही वर्षांमध्ये त्याला वेग आला. आता हा वेग अधिक विस्तारीत होऊन म्हाडा मुंबई मंडळ या गिरणी कामगार किंवा त्यांच्या वारसांना सोडतीतून घरे देण्यासाठी पात्रता निश्चिती करत आहे. त्यासाठी टप्पा ठरविण्यात आला असून, या आधीच्या सोडतींमध्ये यशस्वी न झालेल्या जवळपास 1,50,848 गिरणी कामगार किंवा त्यांच्या वारसांना घरांचे सोडतीद्वारे वाटप होणार आहे. त्यासाठी म्हाडाने पात्रतानिश्चिती केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ही मोहीम विनामूल्य असणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी गिरणी कामगार, अथवा त्यांच्या वारसांना पात्रतानिश्चीतबाबद जाणून घेणे आणि अर्ज दाखल करणे यासाठी एक मोबाईल अॅपही उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

गिरणी कामगार, वारस अर्जदार म्हाडा द्वारे पुरविण्यात आलेल्या Mill Worker Eligibility App द्वारे केव्हाही, कधीही आणि कोठी आपला अर्ज अपलोड करु शकतात. अॅपचे हे व्हर्जन अॅड्रॉइड मोबाइलमधील गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस व्हर्जन ॲप स्टोरमध्ये तो उपलब्ध आहे.

दरम्यान, म्हाडा द्वारे 14 सप्टेंबर पासून पात्रता निश्चिती मोहिमेस सुरुवात करणअयात आली आहे. जी वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्रिकेट मैदानासमोरील समाजमंदिर सभागृहात 4 ऑक्टोबर पासून राबवली जात आहे. महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत 16,980 गिरणी कामगार अथवा त्यांच्या वारसांकडून कागदपत्रे प्रापत् झाली आहेत. त्यापैकी 11,115 जणांनी प्रक्रियेत ऑनलाईन सहभाग नोंदवला.

म्हाडा द्वारे घर मिळविण्यासाठी राज्य आणि देशभरातून पात्र गिरणी कामगार किंवा त्यांचे वारस म्हाडा कार्यालयात येतात. या सर्वांना अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे पूर्ण करण्याची सुविधा आहे. अलिकडील काही काळात ऑफलाईन अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या कमी होऊन ऑनलाईन अर्ज दाखल करणाऱ्या मंडळींची संख्या वाढली आहे. याला अनेक कामगार सध्या वृद्धापकाळात आहेत. तर काही कामगारांचे वारस हे विविध नोकरी, व्यवसायानिमित्त देशभर विखूरले आहेत. अशा वेळी त्यांना ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी आणि जवळची वाटते. दरम्यान, सरकार आणि प्रशासनाकडूनही प्रवासाची दगदग आणि कार्यालयात पाहावी लागणारी वाट, यातून दिलासा मिळावा यासाठी ऑनलाईन पर्यायांचा वापर करण्याबाबत अवाहन केले जाते.

म्हाडा समाजातील प्रत्येक उत्पन्न गटासाठी ठराविक संख्येने गृहनिर्माण युनिट्सचे दरवर्षी वाटप करते. ही संख्या प्रत्येक वर्षी बदलते आणि MIG आणि HIG विभागांच्या तुलनेत EWS आणि LIG विभागांमध्ये जास्त वाटा असतो. म्हाडाने प्रत्येक उत्पन्न गटासाठी निवासी युनिट्सची किंमत श्रेणी देखील पूर्व-निर्धारित केली आहे. सर्व EWS गृहनिर्माण युनिट्सची किंमत रु. 20 लाख; सर्व LIG फ्लॅट्स रु.च्या दरम्यान आहेत. 20-30 लाख, सर्व MIG घरांची किंमत रु. 35-60 लाख, तर सर्व HIG फ्लॅट्सची किंमत रु. 60 लाख ते रु. 5.8 कोटी, अशा स्वरुपात या किमती असतात. ही माहिती उपलब्ध स्त्रोतांवर आधारीत आहेय याची वाचकांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.