Mumbai Metro E-Tickets: आता व्हॉट्सअॅपवरून काढता येणार मेट्रोचं तिकिट; 'असा' घ्या मुंबई मेट्रोच्या नवीन सुविधेचा लाभ
या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'नेहमी वाटचाल करणाऱ्या शहराला आता कशासाठीही थांबण्याची गरज नाही. तिकीटासाठीही नाही. सोयीसाठी “हाय” म्हणा आणि मुंबई मेट्रोचे तिकीट मिळवा.'
Mumbai Metro E-Tickets: मुंबई मेट्रोने (Mumbai आता एक नवीन फीचर आणले आहे. ज्यामुळे प्रवाशांना व्हॉट्सअॅपवरून तिकीट खरेदी करता येणार आहे. मेट्रोने आता ट्विटरवर एक व्हिडिओ ट्यूटोरियल देखील पोस्ट केले आहे जेणेकरुन नागरिकांना नवीन वैशिष्ट्याबद्दल सांगण्यात आलं आहे. मुंबई मेट्रोने यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'नेहमी वाटचाल करणाऱ्या शहराला आता कशासाठीही थांबण्याची गरज नाही. तिकीटासाठीही नाही. सोयीसाठी “हाय” म्हणा आणि मुंबई मेट्रोचे तिकीट मिळवा.' (हेही वाचा - Kolhapur CCTV Video: कोल्हापूर येथे रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारत रुग्णाची आत्महत्या (व्हिडिओ))
व्हॉट्सअॅपद्वारे 'असं' करा मेट्रोचं तिकीट बुक -
- 967000-8889 या WhatsApp क्रमांकावर मेसेज पाठवा.
- मुंबई मेट्रो ई-तिकीटिंगने पाठवलेल्या लिंकवर क्लिक करा.
- ड्रॉप-डाउन मेनूमधून, तुमचा स्रोत आणि गंतव्य स्थाने निवडा.
- तुम्हाला हव्या असलेल्या तिकिटांची संख्या निवडा.
- क्रेडिट कार्ड किंवा UPI सारख्या तुमच्या पसंतीच्या पेमेंट पद्धतीसह ऑनलाइन पेमेंट करा.
दरम्यान, 20 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई मेट्रो लाईन्स 2A आणि 7 चे उद्घाटन केले. लाईन 2A अंधेरी पश्चिमेतील दहिसर पूर्व ते DN नगर पर्यंत जाते, तर लाइन 7 अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व ला जोडते.