Metro Line 3 Ridership: मुंबईच्या महत्वाकांक्षी मेट्रो लाईन 3 वर पहिल्या तीन महिन्यांत दिसली निराशाजनक रायडर्स संख्या; जास्त दर व कनेक्टिव्हिटीच्या अभावाने केली प्रवाशांची निराशा
संपूर्ण 33.5-किलोमीटर कॉरिडॉर पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर दिवसाला 1.3 दशलक्ष प्रवासी या लाईनवरून प्रवास करतील अशी अपेक्षा एमएमआरसीला आहे. मात्र आता समोर आलेली तीन महिन्यांतील प्रवाशांची ही संख्या एमएमआरसीच्या अपेक्षेपासून खूप दूर आहे.
Metro Line 3 Ridership: मागच्यावर्षी 7 ऑक्टोबरपासून, मुंबईतील मेट्रो लाइन 3 पहिल्या भूमिगत मेट्रो कॉरिडॉरचा म्हणजेच एक्वा लाइनचा पहिला टप्पा- वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) ते आरे, कार्यान्वित झाला. रस्ते रहदारी कमी होण्याबाबत या लाइनकडून प्रशासनाच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र आता या लाईनवर पहिल्या तीन महिन्यांत निराशाजनक रायडर्स संख्या दिसली आहे, ज्यामुळे शहरातील वाहतूक आव्हाने कमी करण्याच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) अद्याप तपशीलवार रायडरशिप डेटा उघड केला नसला तरी, अंदाजे 20,000 प्रवासी दररोज या लाईनचा वापर करत आहेत.
संपूर्ण 33.5-किलोमीटर कॉरिडॉर पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर दिवसाला 1.3 दशलक्ष प्रवासी या लाईनवरून प्रवास करतील अशी अपेक्षा एमएमआरसीला आहे. मात्र आता समोर आलेली तीन महिन्यांतील प्रवाशांची ही संख्या एमएमआरसीच्या अपेक्षेपासून खूप दूर आहे. आरे जेव्हीएलआर ते बीकेसीपर्यंत पसरलेल्या एक्वा लाईनच्या पहिल्या टप्प्यात सिप्झ, मरोळ नाका, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) T1, T2, वांद्रे कॉलनी अशा प्रमुख थांब्यांसह 10 स्थानके आहेत.
महत्वाच्या ठिकाणापासून स्थानके दूर-
या लाईनबाबत एका वरिष्ठ वाहतूक विश्लेषकाने सांगितले की, यावरील स्थानके ही महत्वाच्या क्षेत्रांपासून दूर आहेत. अनेक मुख्य ठिकाणी पोहोचण्यासाठी स्थानकांपासून गर्दीच्या रस्त्यावर 500 मीटर किंवा त्याहून अधिक चालणे आवश्यक आहे, जे प्रवाशांसाठी त्रासदायक आहे. याव्यतिरिक्त, मेट्रो स्थानकांपासून रस्ते आणि रेल्वे जोडही अपुरी आहे, ज्यामुळे प्रवाशी या मार्गावरून प्रवास करण्यास उत्साहित नाहीत. (हेही वाचा: Mumbai Metro Line 2B: मुंबईकरांसाठी खुशखबर! मेट्रो लाईन 2ब पूर्णत्वाच्या मार्गावर, 78 टक्के काम पूर्ण, जाणून घ्या स्थानके व इतर तपशील)
मेट्रोऐवजी बस सेवा हा परवडणारा आणि कार्यक्षम पर्याय -
बीकेसी ते कफ परेड पर्यंतचा आगामी विस्तार रायडरशिपला चालना देईल अशी अपेक्षा आहे. मात्र मुंबईच्या आर्थिक जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या बीकेसी स्थानकवर पोहोचण्यासाठीही अनेक कार्यालयांपासून 20 मिनिटे पायी चालत जावे लागते. दुसरीकडे या भागात चालणाऱ्या बसेस 5 रुपये इतके कमी भाडे घेतात, त्यांच्या सेवाही खूप जास्त आहेत. यामुळे प्रवासासाठी मेट्रोऐवजी बस सेवा हा परवडणारा आणि कार्यक्षम पर्याय बनतो.
कनेक्टिव्हिटीचा अभाव-
आणखी एक वाहतूक तज्ञ एव्ही शेनॉय यांनी अधोरेखित केले की, मरोळ नाका वगळता बहुतेक मेट्रो 3 स्थानके ही प्रमुख कामाच्या ठिकाणी सहज चालण्याच्या अंतरावर नाहीत. हा मार्ग घर ते थेट कामाच्या ठिकाणी प्रवासाची सेवा देत नाही. शेनॉय यांनी अखंड विमानतळ कनेक्टिव्हिटीचा अभाव देखील अधोरेखित केला. विमानतळावर किंवा तेथून प्रवास करणारे प्रवासी सामान्यतः सामानामुळे थेट वाहतुकीला प्राधान्य देतात, ज्यामुळे मेट्रोचा वापर अव्यवहार्य होतो. बऱ्याच स्थानकांवर पुरेशा बेस्ट बस आणि ऑटो-रिक्षा सेवांचा अभाव आहे, ज्यामुळे प्रवाशांना मेट्रो पॉइंटपर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त वेळ आणि पैसा खर्च करावा लागतो.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)