Mumbai Weather Forecast Today: मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
Mumbai Weather Forecast Today: भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी मुंबईत हलका ते मध्यम पाऊस (Mumbai Rain) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईकरांना दिवसभर शहर आणि उपनगरात मध्यम पावसाची अपेक्षा आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कमाल तापमान 31 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. त्याशिवाय, आज रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा तसेच सांगली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. (हेही वाचा:Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणारे पाच तलाव भरले, सर्व धरणांमध्ये एकूण 89 टक्के जलसाठा)
पोस्ट पहा