Mumbai Local Megablock Update: आज मध्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक; लोकलचा प्रवास करण्यापूर्वी पहा वेळापत्रक

नंतर या सेवा माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

Railway (Photo Credits: Twitter)

Mumbai Local Megablock Update: मध्य रेल्वे (Central Railway) च्या उपनगरीय भागांमध्ये दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. सीएसएमटीवरून (CSMT) सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढे जलद गाड्या मुलुंड येथे पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ठाण्याहून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. नंतर या सेवा माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. (हेही वाचा - Ashish Shelar On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे मुस्लीम मतदारांना गोवण्याचे काम करत आहेत, आशिष शेलारांची टीका)

या ठिकाणच्या सेवा हार्बर मार्गावर बंद राहतील -

पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीहून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत बंद राहतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी विभागांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांवरून प्रवास करण्याची मुभा आहे.

पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नाही -

त्याचबरोबर पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसभराचा ब्लॉक असणार नाही. पश्चिम रेल्वेवर शनिवार/रविवार मध्यरात्री गोरेगाव आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान रात्रीचा ब्लॉक आहे.