Mega Block: आज मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; पहा वेळापत्रक
आज मध्य, पश्चिम, हार्बर तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असून रद्द झालेल्या गाड्या आणि बदललेल्या वेळा लक्षात घेऊनच बाहेर पडणे सोयीस्कर ठरेल.
Mumbai MegaBlock: दर रविवार प्रमाणे आजही (17 मार्च) रेल्वेमार्गाच्या विविध कामांसाठी तसंच कुर्ला-शीव पुलाच्या कामामुळे दरम्यान मध्य रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तसंच आसनगाव-कसारा मार्गावर पादचारी पुलाचे गर्डर टाकण्याच्या कामामुळे ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर देखील बोरिवली-गोरेगाव स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावर देखील कुर्ला-वाशी दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. प्रवाशांनी खोळंबा टाळण्यासाठी बदललेल्या वेळा लक्षात घेऊन बाहेर पडणे अधिक सोयीस्कर ठरेल.
मध्य रेल्वे:
मध्यरात्री 1 ते पहाटे 4 (शनिवार-रविवार आणि रविवार-सोमवार) या दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील धीम्या आणि जलद लोकलसेवेवर परिणाम होणार आहे.
शनिवारी-रविवारी रात्री उशिरा धावणाऱ्या 12:28 सीएसएमटी-ठाणे, 12:31 कुर्ला लोकल रद्द करण्यात आली आहे. 10:01 अंबरनाथ-सीएसएमटी ही लोकल ठाणे स्थानकात रद्द करण्यात येतील.
माटुंगा-मुलुंड दरम्यान सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 रविवार दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असून या काळात धीम्या मार्गावरील फेऱ्या डाऊन फास्ट मार्गावर चालवण्यात येतील. जलद-अर्धजलद अप लोकल सुमारे 15 मिनिटे तर जलद-अर्धजलद डाऊन लोकल सुमारे 20 मिनिटे आणि धीम्या मार्गावरील लोकल 10 मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
कर्जत स्थानकात सकाळी 10:40 ते दुपारी 1:40 (रविवार) दरम्यान ब्लॉक असून 10:48 आणि 12:05 ठाणे-कर्जत, 1:57 ची कर्जत-सीएसएमटी या लोकल्स रद्द करण्यात आल्या आहेत.
आसनगाव-कसारा या मार्गावरील लोकल फेऱ्या सकाळी 10:50 ते दुपारी 12:50 (रविवार) रद्द होणार आहेत. तर 9:41 आणि 10:16 ची सीएसएमटी-कसारा लोकल आसनगाव स्थानकात रद्द करण्यात येईल. 11:12, 11:19 या दोन कसारा-सीएसएमटी लोकल सुमारे 30 ते 40 मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वेवर कुर्ला वाशी दरम्यान सकाळी 11:10 ते दुपारी 3:40 (रविवार) अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटी-वाशी-बेलापूर-पनवेल-सीएसएमटी मार्गावर अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर कुर्ला-सीएसएमटी आणि पनवेल-वाशी मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेवर सकाळी 10:35 ते दुपारी 3:35 (रविवार) दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर बोरिवली ते गोरेगाव दरम्यान मेगाब्लॉक असेल. या काळात धीम्या मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)