Mega Block 15th December 2019: मध्य ,ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक;जाणून घ्या वेळापत्रक
दर आठवड्याप्रमाणे उद्याच्या रविवारी म्हणजेच 15 डिसेंबर रोजी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर कसा आहे मेगाब्लॉक?
मुंबईकरांची लाईफ लाईन म्ह्णून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलला (Mumbai Local) रविवारी तांत्रिक कामानिमित्त ब्रेक दिला जातो, त्यामुळे साहजिकच रविवारच्या दिवशी प्रवास करणाऱ्यांना मेगाब्लॉकची गणितं सांभाळण्याचे टेन्शन असते. दर आठवड्याप्रमाणे उद्याच्या रविवारी म्हणजेच 15 डिसेंबर रोजी मध्य (Central Railway), पश्चिम (Western Railway) आणि ट्रान्स हार्बर (Trans Harbour) मार्गावर ब्लॉकचे (Megablock) नियोजन करण्यात आले आहे. यानुसार पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वे वरील कल्याण ते दिवा आणि ट्रान्स हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान मेगा ब्लॉकअसेल . ब्लॉकमुळे लोकलच्या काही फेऱ्या रद्द राहतील तर अन्य ठिकाणी लोकल नेहमीपेक्षा उशिराने धावणार असल्याचे रेल्वे तर्फे सांगण्यात आले आहे.
मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर कसा आहे मेगाब्लॉक?
मध्ये रेल्वे
मध्य रेल्वे वर कल्याण ते दिवा अप जलद मार्गावर दुरुस्तीनिमित्त सकाळी 11.25 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. परिणामी ब्लॉक काळात कल्याण ते ठाणे दरम्यान जलद मार्गावरील सेवा धिम्या मार्गावरून सोडण्यात येणार आहे.
(कर्जत-कसारा येथून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी पर्यायी वाहतूकीची सोय करण्यात यावी- हायकोर्ट)
ट्रान्स हार्बर
पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.00 पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ज्यामुळे, अप हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेलकडे जाणाऱ्या (सकाळी 11.06 ते दुपारी 4.01 या वेळात) आणि डाऊन मार्गावरून पनवेल, बेलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या (सकाळी 10.03 ते दुपारी 3.16 या वेळात) लोकलच्या फेऱ्या रद्द असणार आहेत.
तसेच ठाणे-पनवेल दरम्यान सकाळी 10.12 ते दुपारी 3.53 काळात धावणाऱ्या, तसेच ठाणे-पनवेलदरम्यान सकाळी 11.14 ते दुपारी 3.20 काळात धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप, डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी जलद मार्गावरील जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाडय़ा धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. तर काही लोकलफेऱ्या रद्द असणार आहेत.
ब्लॉक काळात गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेचे वेळापत्रक पाहून मगच आपला प्रवास आखावा.