Measles Outbreak in Mumbai: मुंबई मध्ये गोवरचे 24 नवे रूग्ण; अजून एक वर्षीय चिमुकलीचा संशयित मृत्यू
त्यापैकी 67 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, तर 26 रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आणि एक व्हेंटिलेटरवर आहे.
मुंबई मध्ये सोमवारी 24 नवे गोवरची (Measles) रूग्ण समोर आले आहेत. यामध्ये 1 वर्षीय मुलीचा गोवर मुळे संशयित मृत्यू झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. 1 जानेवारीपासून मुंबई (Mumbai) मध्ये गोवरची रूग्णसंख्या 208 वर पोहचली आहे. अशी माहिती बीएमसी(BMC) ने दिली आहे. मुंबईत गोवर मुळे मृत्यू झालेल्यांचा एकूण आकडा 8 पर्यंत पोहचला आहे. गोवंडी देवनार भागात सहा नवे रूग्ण समोर आले आहेत. तर कुर्ला मध्ये 5 नवे रूग्ण आहेत.
ताप आणि पुरळ यासारखी लक्षणे असलेल्या संशयित रुग्णांची संख्या 3,208 पर्यंत वाढली आहे, असे BMC ने जाहीर केले आहे. पुरळ असलेल्या तापाच्या सर्व रुग्णांना 24 तासांनंतर व्हिटॅमिन-ए चे दोन डोस आणि गोवर लसीचा दुसरा डोस दिला जातो. नक्की वाचा: Measles Vaccination Drive: मुंबई उपनगरातील सर्व वॉर्डमध्ये 1 ते 31 डिसेंबर या कालावधीत गोवर लसीकरण मोहीम.
सध्या हॉस्पिटलमध्ये 23 रुग्ण दाखल झाले आहेत आणि 22 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या गोवर रुग्णांची संख्या 94 झाली आहे. त्यापैकी 67 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे, तर 26 रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आणि एक व्हेंटिलेटरवर आहे. "मुंबईतील गोवरचा उद्रेक लक्षात घेता, सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी नऊ महिने ते पाच वर्षे वयोगटातील मुलांना लसीकरण करावे," असे बीएमसीने म्हटलं आहे.
दरम्यान मागील काही दिवसांत मुंबई प्रमाणेच महाराष्ट्राच्या इतर शहरांमध्येही गोवरचे रूग्ण आढळले आहे. मुंबईमध्ये लहान मुलांप्रमाणेच आता प्रौढ देखील गोवरच्या लक्षणांनी बाधित झालेले पहायला मिळाले आहेत त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेमध्ये अजून वाढ झाली आहे.