मावळ लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: श्रीरंग बारणे विरुद्ध पार्थ पवार लढतिकडे देशाचे लक्ष, काट्याच्या टक्करीमुळे उत्सुकता शिघेला

श्रीरंग बारणे हे या मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. 2014 मध्ये झालेल्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे आला होता. मात्र, 2019 लोकसभा निवडणुकीसाठीच्या युतीच्या जागावाटपात शिवसेना-भाजप यापैकी हा मतदारसंघ कोणाकडे जाणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तरीही 2014 च्या निवडणुकीत उमेदवारांना पडलेल्या मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकता त्या वेळी अपक्ष असलेले लक्ष्मण जगताप (सध्या भाजपचे विद्यमान आमदार) पार्थ पवार यांना जोरदार टक्कर देऊ शकतील.

Parth Pawar (Photo Credit; Facebook)

Maval Lok Sabha Constituency Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून संयुक्त पुरोगामी आघाडीचे महत्त्वाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) हे या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तर, शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे पार्थ पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. इथे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारही निवडणूक रिंगणात आहे. परंतू श्रीरंग बारणे विरुद्ध पार्थ पवार अशीच प्रमुख लढत इथे पाहायला मिळत आहे. दरम्यान, एक्झिट पोल्सनी भाजप-शिवसेना युतीला अनुकूल तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला प्रतिकूल अंदाज दर्शवले आहेत. या पार्श्वभूमीवर हाती येत असलेली निकालाची आकडेवारी उत्सुकता वाढवणारी आहे.

पश्चिम महाराष्ट्रात असलेला मावळ लोकसभा मतदारसंघ (Maval Lok Sabha constituency) हा कधी नव्हे इतका चर्चेत आला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचे महत्त्वाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) हे या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतारसंघात दौरे सुरुही केले आहेत. तसे, ते उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच या मतदारसंगात संपर्क ठेऊन होते. पार्थ पवार यांच्या नावाला घराणेशाहीचे वलय आहे. त्यांच्या घराण्याचा राजकारणातील दबदबा पाहता मावळ लोकसभा मतारसंघातून ते मैदान मारतील असे कोणालाही वाटणे स्वाभाविक आहे. काही प्रमाणात त्यात तथ्यही आहे. परंतू, हे पूर्ण सत्य नाही. या मतदारसंघातून विजयश्री खेचून आणण्यास पार्थ पवार यांच्यासमोरही काही आव्हाने आहेत. या आव्हानांचा यशस्वी सामना करुन ती पेलली तर, पार्थ पवार यांचा विजय नक्की आहे. ती पेलण्यास त्यांना अपयश आले तर मात्र पार्थ पवार अडचणीत येऊ शकतात.

मावळ लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ आणि राजकीय स्थिती

मावळ लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ आणि पक्षीय बलाबल

विधानसभा मतदारसंघ राजकीय पक्ष आमदाराचे नाव

मावळ लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघ आणि पक्षीय बलाबल
विधानसभा मतदारसंघ राजकीय पक्ष आमदाराचे नाव
पनवेल  (188) भाजप प्रशांत ठाकूर
कर्जत (189) राष्ट्रवादी काँग्रेस सुरेश लाड
उरण (190) मनोहर भोईर शिवसेना
मावळ (204) संजय भेगडे भाजप
चिंचवड (205) लक्ष्मन जगताप भाजप
पिंपरी (206) ऍड. गौतम चाबुकस्वार शिवसेना

 

वरील एकूण स्थिती पाहता सहज लक्षात येते की, मतदारसंघावर शिवसेना-भाजप युतीचे वर्चस्व आहे. एकट्या कर्जत विधानसभा मतदारसंघातील सुरेश लाड यांचा अपवाद वगळता उर्वरीत सर्व (5) विधासभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाहीत. त्यामुळे पार्थ पवार यांना तळागाळातून सुरुवात करावी लागेल.

पार्थ पवार यांना कोणाचे आव्हान?

2014 लोकसभा निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना झालेल्या मतदानाची आकडेवारी
राजकीय पक्ष उमेदवार मिळालेली एकूण मते
शिवसेना श्रीरंग बारणे तब्बल ५ लाख १२ हजार २२६
अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप ३ लाख ५४ हजार ८२९
राष्ट्रवादी काँग्रेस राहुल नार्वेकर ---

 

श्रीरंग बारणे हे या मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत. 2014 मध्ये झालेल्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे आला होता. मात्र, 2019 लोकसभा निवडणुकीसाठीच्या युतीच्या जागावाटपात शिवसेना-भाजप यापैकी हा मतदारसंघ कोणाकडे जाणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तरीही 2014 च्या निवडणुकीत उमेदवारांना पडलेल्या मतदानाच्या आकडेवारीवर नजर टाकता त्या वेळी अपक्ष असलेले लक्ष्मण जगताप (सध्या भाजपचे विद्यमान आमदार) पार्थ पवार यांना जोरदार टक्कर देऊ शकतील.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे भौगोलिक स्थान ध्यानात घेता. एकूण सहा विधानसभा मतदारसंघापैकी तिन मतदारसंघ हे रायगड जिल्ह्यातील (पनवेल, उरण, कर्जत) तर उर्वरीत तीन विधानसभा मतदारसंघ हे पुणे जिल्ह्यातील (मावळ, पिंपरी, चिंचवड) आहेत. पुण्यात राष्ट्रवादी तर, रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) प्रभावी आहे. शेकाप हा सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत आहे. परंतू, शेकापचे एक वैशिष्ट्य असे की, शेकापची रायगड जिल्ह्यात पक्षबांधणी मजबूत आहे. जर उमेदवार शेकापचा असेल तर या पक्षाचा कार्यकर्ता आणि समर्थक मतदार त्या उमेदवाराला एकगठ्ठा मतदान करतो. मात्र, उमेदवार जर आघाडी करुन आलेला असेल, दुसऱ्या पक्षाचा असेल तर असे एकगठ्ठा मतदान होतेच असे नाही, असे राजकीय अभ्यासक सांगतात. त्यामुळे या मतदारांची एकत्र मोट बांधण्याचेही आव्हान पार्थ पवार यांना सांभाळावे लागणार आहे.

राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचा फटका

या मतदारसंघाती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे. मात्र, नेत्यांमधील पक्षांतर्गत संघर्ष आणि मतभेत यामुळे विविध गट-तट निर्माण झाले आहेत. अशा वेळी पक्षांतर्गत वाद आणि गटतट मोडून काढत सर्वांना सोबत आणण्याचे मोठे आव्हान पार्थ पवार यांच्यासमोर असेल. अर्थात अशी गटबाजी सर्वच राजकीय पक्षांमध्ये पाहायला मिळते.

घराणेशाहीच्या आरोपाला उत्तर काय?

वरील सर्व मुद्द्यांपैकी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पार्थ पवार यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होणार. हा आरोप वास्तवतेवर आधारलेला असल्यामुळे पवार यांना हा मुद्दा काळजीपूर्वक हाताळावा लागणार आहे. कारण, शरद पवार, सुप्रिया पवार, अजित पवार, रोहित पवार ही घरातील मंडळी आगोदरच राजकारणात असल्यामुळे पुन्हा एकदा आणखी एका पवार कुटुंबातील सदस्याला मतदान का करायचे ? हा सवाल विरोधकांसह जनताही विचारु शकते. त्यामुळे या सर्व अडचणींचा सामना पार्थ पवार यांना करावा लागणार आहे. या अडचणी आणि आव्हानांचा सामना करत योग्य तोडगा काढल्यास पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवू शकतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Tags

BJP Winning Candidates BJP Winning Seats in 2019 Congress Winning Candidates Congress Winning Seats in 2019 Election Results 2019 India General Election Results 2019 General Elections 2019 Results Indian Lok Sabha Results 2019 List of BJP Winners List of Congress Winners Lok Sabha Election Results Lok Sabha Election Results 2019 Lok Sabha Elections 2019 Lok Sabha Elections 2019 Final Results Lok Sabha Elections 2019 Results Maval Lok Sabha Constituency Election Results 2019 Parth Pawar Results of Election 2019 Results of Lok Sabha 2019 Results of Lok Sabha Elections 2019 अपक्ष उमेदवार कॉंग्रेस कॉंग्रेस विजयी उमेदवार कॉंग्रेस विजयी उमेदवार यादी बीजेपी भाजप भाजपा भाजपा विजयी उमेदवार महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष मावळ लोकसभा निकाल पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणूक निकाल राष्ट्रवादी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस विजयी उमेदवार लोकसभा निवडणूक २०१९ लोकसभा निवडणूक अंतिम निकाल 2019 लोकसभा निवडणूक निकाल 2019 वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी विजयी उमेदवार शिवसेना शिवसेना विजयी उमेदवार शिवसेना विजयी उमेदवार यादी श्रीरंग बारणे सार्वत्रिक निवडणूक निकाल 2019 स्वाभिमानी शेतकरी संघटना

Share Now