मुंबई: Lockdown च्या काळात सरकारचे नियम धाब्यावर बसविणा-या Kooler Cafe च्या मालकाला पोलिसांचा दणका, Watch Viral Video
व्हिडिओमध्ये आपल्या गाडीचा पोलिसांची गाडी पाठलाग करत असतानाचा आवाज समजत असताना देखील कुलक कॅफेचा मालक निर्धास्तपणे गाडी चालवत होता आणि त्याच्या गाडीत बसलेला त्याचा मित्र हा सर्व व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करत होता.
कोरोना व्हायरससारखा (Coronavirus) महाभयंकर विषाणू सध्या संपूर्ण जगभरात थैमान घालत आहे. याचे लोण देशातही पोहोचले संपूर्ण भारतात 21 दिवसांचा लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे. असे असतानाही काही कपाळकरंट्यांना या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येत नाही आहे. विनाकारण घराबाहेर पडणा-या अशा लोकांना पोलिसी खाक्या दाखविण्याचे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सुरु केले आहे. असे असतानाही पोलिसांनी डिवचत मुंबईच्या रस्त्यांवर गाडी चालविणा-या कुलर कॅफेच्या (Kooler Cafe) मालकाला माटुंगा पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवत अटक केली आहे. या मालकाच्या गाडीचा पाठलाग करुन माटुंगा पोलिसांनी त्याची थेट पोलीस स्टेशनात पोहोचवले. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये आपल्या गाडीचा पोलिसांची गाडी पाठलाग करत असतानाचा आवाज समजत असताना देखील कुलक कॅफेचा मालक निर्धास्तपणे गाडी चालवत होता आणि त्याच्या गाडीत बसलेला त्याचा मित्र हा सर्व व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करत होता.
पाहा व्हिडिओ:
सरकारच्या नियमांची अंमलबजावणी न करता राजरोसपणे रस्त्यावर गाडी चालविणा-या या बेशिस्त कुलर कॅफेच्या मालकाला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र सरकारने कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यात नवे कोरोनाचे 28 रुग्ण आढळून आले आहेत. तर 26 रुग्णांना डिस्चार्ज तर 104 जणांची कोरोना व्हायरसची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र एकूण राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 181 वर पोहचला आहे.