Nagpur Fire: नागपूर येथील अंबाझरी जैवविविधता उद्यानात भीषण आग; अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर (Nagpur) येथील अंबाझरी जैवविविधता उद्यानात (Ambazari Biodiversity Park) भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Nagpur Fire: नागपूर येथील अंबाझरी जैवविविधता उद्यानात भीषण आग; अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल
Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

Fire Breaks Out at Ambazari Biodiversity Park: महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर (Nagpur) येथील अंबाझरी जैवविविधता उद्यानात (Ambazari Biodiversity Park) भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आज तीन वाजताच्या सुमारास ही आग लागली आहे. या घटनेची महिती होताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत सुमारे 50 हेक्टर परिसर कवेत घेतल्याची माहिती उपवनसरंक्षक प्रभूनाथ शुक्ल यांनी दिली आहे. तसेच गवतामध्ये कागद आणि पॉलिथिनचे तुकडे असल्यामुळे ही पसरल्याचे सांगितले जात आहे.

सविस्तर माहिती थोड्याच वेळात...

(The above story first appeared on LatestLY on Feb 03, 2021 06:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).