Mumbai Horror: मसाज करताना स्पॅनिश महिला नागरिकावर लैगिंक अत्याचाराची घटना; फसवूण फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा आरोप

त्याशिवाय, त्यांचे अवैध फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

Photo Credit- X

Mumbai Horror: मुंबईतील मढ आयलंडमध्ये (Madh Island) स्पॅनिश महिला नागरिकावर (Spanish National) अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. मसाज करताना त्यांना चुकीच्या प्रकारे हात लावला (Sexually Assault) गेला. त्याशिवाय, त्यांचे फसवूण चुकीच्या प्रकारे फोटो काढले गेल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करून 42 वर्षीय मसाज थेरपिस्टला(Massage Therapist) अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय स्पॅनिश महिला गेल्या महिन्यात टुरिस्ट व्हिसावर भारतात आली होती. मालाडच्या मढ बेटावर तिच्या भारतीय महिला मैत्रिणीच्या घरी राहात होती. (Woman Slaps Drunk Man Inside Bus: बसमध्ये छेड काढणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला महिलेने दिला चोप; पहा व्हायरल व्हिडिओ)

अयोग्यरित्या स्पर्श केला

सोमवारी, 16 डिसेंबर रोजी पीडितेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे मसाज सेवेच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला. तेव्हा आरोपी, जो थेरपिस्ट म्हणून काम करत होता. त्यांनतर दुसऱ्या दिवशी त्याने मैत्रीणीच्या घरी मसाजसाठी येणार असल्याचे कळवले. त्यावर मंगळवारी 17 डिसेंबर रोजी पीडितेच्या मित्राच्या घरी तो गेला. घटनेच्या दिवशी, आरोपीने पीडितेच्या मैत्रिणीची बॉडी मसाज केली. त्यादरम्यान त्याने तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. त्यावर महिलेने आक्षेप घेतला. आरोपीने महिलेचा आक्षेप फेटाळला आणि मसाज करण्यास सुरुवात केली.

 फोटो आणि व्हिडिओ काढले

त्यानंतर त्याने त्याचे गैरवर्तन सुरूच ठेवले. यादरम्यान, महिलेला तिचे चुकीच्या रित्या फोटो आणि व्हिडिओ काढल्याचा संशय आला. महिलेने आरोपीला त्याचा मोबाईल फोन मागितीला. त्याने तो देण्यास महिलेला नकार दिला. त्यावर महिलेने तात्काळ मालवणी पोलिसांना फोन केला, त्यांनी घटनास्थळी पोहोचून मसाजरला अटक केली. पोलिसांनी त्याचा फोनही जप्त केला आहे. या अटकेनंतर, आरोपीला बोरिवली महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले, न्यायालयाने त्याला 21 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif