Cidco Mass Housing योजनेमधील पुढील प्रक्रियेतील शिफारस, अपात्र उमेदवारांची यादी जाहीर; cidco.nivarakendra.in वर पहा तुमचं स्टेटस!

CIDCO | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Twitter)

Cidco Mass Housing Results:   सिडकोच्या मास हाऊसिंग लॉटरीच्या (Cidco Mass Housing) अर्जदारांसाठी योजनेमधील पुढील प्रक्रियेतील शिफारस केलेल्यांची यादी आणि अपात्र उमेदवारांची यादी जाहीर याच स्टेट्स ऑनलाईन जाहीर करण्यात आलं आहे. cidco.nivarakendra.in या संकेतस्थळावर त्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान सिडकोने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा लॉग ईन आयडीच्या माध्यमातून हे स्टेट्स ऑनलाईन पाहता येणार आहे. जर अर्जदारांना पुढील प्रक्रियेकरिता शिफारस असा मेसेज आला तर लवकरच पुढील प्रक्रियेबद्दल कळवलं जाईल. जर त्रृटी असतील तर अर्ज झाला असेल मात्र काही तफावत असेल तर अपात्र उमेदवारांना अपील करण्याची पुन्हा संधी मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी मास हाऊसिंग प्रमाणेच स्वप्नपूर्ती हाऊसिंग लॉटरीचा देखील निकाल जाहीर करण्यात आला आहे.

तुमच्या अर्जाचं स्टेटस कसं बघाल?

सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजने अंतर्गत घरांची लॉटरी रोजी काढली जाते. या योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (पंतप्रधान आवास योजना) आणि अल्प उत्पन्न गट यांच्यासाठी विशेष घरांची तरतूद केलेली असते. दरम्यान मध्यम वर्गीयांसाठी महाराष्ट्रात स्वतःच्या हक्काचं घर घेणार्‍यांचं स्वपन असणार्‍यांसाठी ही सिडकोची लॉटरी महत्त्वाची असते. दरवर्षी लाखो लोक या स्वप्नपूर्ती साठी प्रयत्न करत असतात.