वानखेडे स्टेडियम मध्ये COVID-19 रुग्णांना ठेवण्यास मरीन ड्राईव्ह सिटीझन असोसिएशनचा विरोध

या ठिकाणी कोविड रुग्णांना क्वारंटाईन करु नये असे त्यांनी सांगितले असून त्यांनी या संदर्भातले पत्र मुंबई पालिका आयुक्तांना दिले आहे.

Wankhede Stadium 9Photo credits: Wikimedia Commons)

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना संक्रमित मुंबईत आहे. अशा वेळी रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे मुंबईतील वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) हे कोविड रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी आयसोलेशन सेंटर उभारण्यासाठी तात्पुरता ताब्यात देण्यात यावे अशी मागणी BMC ने मुंबई क्रिकेट असोसिएशनला विनंती केली आहे. त्यासंदर्भातील पत्र देखील त्यांनी MCA ले दिले आहे. मात्र या स्टेडियम जवळ असलेल्या मरीन ड्राईव्ह सिटीझन असोसिएशनने यास विरोध दर्शविला आहे. या ठिकाणी कोविड रुग्णांना क्वारंटाईन करु नये असे त्यांनी सांगितले असून त्यांनी या संदर्भातले पत्र मुंबई पालिका आयुक्तांना दिले आहे.

'हा भाग हेरिटेज म्हणून पाहिला जातो. येथे एकही कोरोना रुग्ण नसून हा ग्रीन झोन आहे. अशातच वानखेडे स्टेडियम कोविड रुग्णांसाठी दिल्यास येथील नागरिकांना त्याचा त्रास होऊ शकतो' असे मरीन ड्राईव्ह सिटीझन असोसिएशनचे म्हणणे आहे. Wankhede Stadium: वानखेडे स्टेडियमचा तात्पुरता ताबा देण्याची BMC ची MCA ला विनंती; क्वारंटाईन सेंटर म्हणून रुपांतरीत करण्याचा बीएमसीचा मानस

 त्याचबरोबर सरकारने सांगितलेल्या नियमानुसार, हे क्वारंटाईन वा आयसोलेशन सेंटर हे नागरी वस्ती पेत्रा लांब असले पाहिजे. मात्र या स्टेडियम जवळ अनेक लोक राहतात.यात अनेक ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. म्हणून यास आमचा विरोध असल्याचे या असोसिएशनने म्हटले आहे.

वानखेडे स्टेडियमचे रुपांतर महापालिकेच्या आपत्कालीन कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी आणि कोरोना व्हायरस एसिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह रूग्णांना (Asymptomatic Positive Patients) वेगळे ठेवण्यासाठी एक सेंटर बनवण्याचा बीएमसीचा मानस आहे.

राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 30,706 झाली आहे तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1135 झाली आहे. सध्या 22,479 सक्रीय रुग्ण असून, राज्यात 524 लोक बरे झाले असून, आतापर्यंत 7088 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.