मराठा आरक्षण: मराठा क्रांती मोर्चाची 'संवाद यात्रा' विधान भवनावर धडकणार

सरकारला प्राप्त झालेला अहवाल आणि सत्यस्थिती याबाबत मराठा समाजाला वास्तव माहिती मिळावी यासाठी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. हीच संवाद यात्रा आज विधान भवनावर धडकत आहे.

मराठा आरक्षण: मराठा क्रांती मोर्चाची 'संवाद यात्रा' विधान भवनावर धडकणार
मराठा आरक्षण (संग्रहित प्रतिमा)

Maratha Reservation: मराठा आरक्षण विषयावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता 'आंदोलन करु नका, एक डिसेंबरला थेट जल्लोषच करा,' असे म्हटले असूनही मराठा क्रांती मोर्चातील अनेकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवर आक्रमक असलेल्या मराठा क्रांती मोर्चाने सुरु केलेली संवाद यात्रा आज (सोमवार, २६ नोव्हेंबर) विधान भवनावर धडकणार आहे. दरम्यान, सुरक्षिततेचा उपाय म्हणून संवाद यात्रेच्या काही कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु केल्याची माहिती आहे. मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या दाव्यानुसार पोलिसांनी धरपकड केलेले कार्यकर्ते प्रामुख्याने मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर या भागांमधील आहेत. संवाद यात्रेसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल होत आहेत.

संवाद यात्रा कशासाठी?

मागासवर्ग आयोगाचा अहवाला सरकारला प्राप्त झाला आहे. हा अहवाल सरकारला प्राप्त झाला याचा अर्थ मराठा समाजाला आरक्षण मिळाले, असा गैरसमज समाजातील नागरिकांचा झाला आहे. मात्र, अहवाल प्राप्त झाला. याचा अर्थ आरक्षण मिळाले असा नव्हे, असे सांगत मराठा क्रांती मोर्चाने 'संवाद यात्रे'चे आयोजन केले. ही संवाद यात्रा १६ नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आली होती. सरकारला प्राप्त झालेला अहवाल आणि सत्यस्थिती याबाबत मराठा समाजाला वास्तव माहिती मिळावी यासाठी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. हीच संवाद यात्रा आज विधान भवनावर धडकत आहे. मात्र, संवाद यात्रेत कार्यकर्त्यांनी सहभागी होऊ नये यासाठी पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड केली जात असल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. सरकार मराठा समाजाचे आंदोलन दडपत असल्याचा दावाही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाकडून काढण्यात येणाऱ्या संवाद यात्रे किती लोक सहभागी होतील याबाबत उत्सुकता आहे. कारण, यापूर्वी निघालेल्या अनेक मोर्चांमध्ये प्रचंड प्रामाणावर सूमह जमला होता. विशेष म्हणजे हे सर्वच मोर्चे अत्यंत शांततेत निघाले होते. या शांततेची दखल राष्ट्रय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही घेतली होती.

(The above story first appeared on LatestLY on Nov 26, 2018 10:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).