Rule Change From 1st November: 1 नोव्हेंबरपासून बदलणार अनेक नियम! दिवाळीत सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ?

1 नोव्हेंबरला देखील एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. निवडणूकांच्या अनुशंगाने सिलिंडरचे दर घसरण्याची दाट शक्यता आहे. त्याशिवाय, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल होत आहेत.

Photo Credit- X

Rule Change From 1st November: ऑक्टोबर संपत आला आहे आणि नोव्हेंबरची सुरुवात होणार आहे. नोव्हेंबर महिन्यात (November Month) काही मोठे बदल (Rule Changes) होणार आहेत, ज्यांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. यामध्ये एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder), क्रेडिट कार्ड नियम (Credit Card Rules), म्युच्युअल फंड नियम (Mutual Fund Rules) आणि इतर क्षेत्रांमधील बदलांचा समावेश आहे. या लेखात आपण या सहा महत्त्वाच्या बदलांवर नजर टाकणार आहोत.

एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत (LPG Cylinder Price) बदल करतात. 1 नोव्हेंबरला देखील एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. लोकांना 14 किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती कमी होण्याची अपेक्षा आहे, ज्याच्या किंमती बऱ्याच काळापासून स्थिर आहेत. तसंच, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial Gas Cylinder) किंमतीत दरमहा बदल होत असतो.

एटीएफ आणि सीएनजी-पीएनजी दरांमध्ये बदल

ऑइल मार्केटिंग कंपन्या महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरप्रमाणेच सीएनजी-पीएनजी आणि एअर टर्बाइन फ्यूल (ATF) दरांमध्येही बदल करतात. गेल्या काही महिन्यांमध्ये हवाई इंधनाच्या किमती कमी झाल्या आहेत, आणि या वेळी सणासुदीच्या निमित्ताने दर कमी होण्याची अपेक्षा आहे. सीएनजी-पीएनजी दरांमध्येही मोठा बदल होण्याची शक्यता आहे.

एसबीआय क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल

1 नोव्हेंबरपासून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल होत आहेत. या बदलांनुसार, क्रेडिट कार्डद्वारे युटिलिटी बिल पेमेंट्स आणि फाइनन्स चार्जेसवर नवा नियम लागू होणार आहे. असुरक्षित क्रेडिट कार्डवर 3.75% फाइनन्स चार्ज लागू होईल, तर 50,000 रुपये पेक्षा जास्त रक्कम असणाऱ्या बिल पेमेंटवर 1% अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

म्युच्युअल फंडाच्या नियमांमध्ये बदल

सेबीने म्युच्युअल फंड नियमांमध्ये बदल केले आहेत, जे 1 नोव्हेंबरपासून लागू होतील. या नियमांनुसार, आता म्युच्युअल फंड युनिटसाठी 15 लाख रुपये पेक्षा अधिक व्यवहारांबद्दल अनुपालन अधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक आहे.

ट्रायचे नवीन टेलिकॉम नियम

टेलिकॉम सेक्टरमध्ये होणारा मोठा बदल 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. ट्राय ने जीओ, एअयटेल आणि इतर सर्व टेलिकॉम कंपन्यांना स्पॅम नंबर ट्रेसिबिलिटी लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता कंपन्या आपल्या युजर्सपर्यंत पोहोचण्यापूर्वीच स्पॅम मेसेजेस ब्लॉक करू शकतील.

 

नोव्हेंबर महिन्यात बँक सुट्ट्या

नोव्हेंबरमध्ये विविध सण आणि सार्वजनिक सुट्ट्यांमुळे बँका एकूण 13 दिवस बंद राहणार आहेत. या काळात बँकेच्या ऑनलाइन सेवा वापरून तुमचे बँकिंग व्यवहार पूर्ण करता येतील, कारण ऑनलाइन सेवा चोवीस तास सुरू असणार आहे.

वरील सर्व बदलांचा थेट परिणाम ग्राहकांच्या रोजच्या जीवनावर होणार आहे. या बदलांविषयीची माहिती तुमच्यासाठी आर्थिक नियोजन करताना उपयुक्त ठरू शकते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement