मंत्रालयात शासकीय कर्मचार्‍याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयामध्ये शासकीय कर्मचारी दिलीप सोनावणे यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

Photo Credits : Facebook

मंत्रालयामध्ये शासकीय कर्मचारी दिलीप सोनावणे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र विष पिऊन दिलीप सोनावणे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

मंत्रालयामध्ये काही महिन्यांपूर्वी धर्मा पाटील या वयोवृद्ध शेतकर्‍यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान धर्मा पाटील यांचं निधन झालं होते. या प्रयत्नानंतर सरकारविरूद्ध विविध पातळ्यांवर निषेध नोंदवण्यात आला होता.

मंत्रालयामध्ये अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. धर्मा पाटीलांचे निधन झाल्यानंतर सरकारने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न होऊ नये म्हणून जाळ्या बसवल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement