मानसी नाईक हिची छेड काढणाऱ्या तीन तरुणांच्या विरुद्ध साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याबाबत मानसीने साकीनाका पोलिसांकडे(Sakinaka Police) पद्धतशीर तक्रार नोंदवली होती.
पुणे (Pune) येथे एका कार्यक्रमाच्या दरम्यान मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Mansi Naik) हिची छेड काढणाऱ्या तीन अज्ञात तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मानसीने साकीनाका पोलिसांकडे(Sakinaka Police) पद्धतशीर तक्रार नोंदवली होती. पुण्यातील शिरूर (Shirur) तालुक्यात रांजणगाव (Ranjangaon) येथे युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवशी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात परफॉर्म करत असताना काही अज्ञात तरुणांनी स्टेजपाशी येऊन मानसी सोबत गैर व्यवहार केला असे तक्रारीत म्हंटले आहे. हे प्रकरण साकीनाका पोलिसांकडून रांजणगाव येथील पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. या तीन अज्ञात तरुणाचा पोलीस तपास घेत आहेत. डान्सिंग क्वीन मानसी नाईक हिने प्रेमाची कबुली देत शेअर केला बॉयफ्रेंड सोबतचा फोटो
प्राप्त माहितीनुसार, पुण्याचे युवासेना जिल्हा प्रमुख यांचा 5 फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता यात मानसी परफॉर्म करत होती. या तरुणांनी तिची छेड काढून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला तसेच तिला धमकावत शांत राहण्यास सांगितले. याबाबत मानसीने मुंबईत परतताच साकीनाका पोलिसात तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात कलम 354 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांनी दिली आहे.
दरम्यान विनयभंग, छेडछाड आणि बलात्काराच्या घटनांचे वाढते प्रमाण नेहमीच महिला सुरक्षेच्या चिंतेत भर टाकत आहे, अलीकडे माटुंगा येथे एका विद्यार्थिनीसोबत सुद्धा एका अज्ञात व्यक्तीने असाच गैर व्हयव्हर केला होता. ही घटना सीसीटीव्हीही मध्ये कैद झाल्याने लगेचच पोलिसांकडून या व्यक्तीला अटक करण्यात आले होते.