Manorama Khedkar Arrested: मनोरमा खेडकर हिस अटक, पौंड पोलिसांनी महाड येथील हॉटेलमधून घेतले ताब्यात

मनोरमा खेडकर (Manorama Khedkar Arrested) या महिलेला अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) महाड येथील एका हॉटेलमधून तिला ताब्यात घेतले. मनोरमा ही वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर (Trainee IAS officer Puja Khedkar) हिची आई आहे.

Manorama Khedkar Arrested: मनोरमा खेडकर हिस अटक, पौंड पोलिसांनी महाड येथील हॉटेलमधून घेतले ताब्यात
Manorama Khedkar Arrested | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मनोरमा खेडकर (Manorama Khedkar Arrested) या महिलेला अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) महाड येथील एका हॉटेलमधून तिला ताब्यात घेतले. मनोरमा ही वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर (Trainee IAS officer Puja Khedkar) हिची आई आहे. पाठिमागील काही दिवसांमध्ये एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये मनोरमा ही हातात पिस्तूल घेऊन स्थानिक शेतकरी आणि गावकऱ्यांना कथीतरित्या धमकावत असल्याचे पाहायला मिळत होते. या व्हिडिओनंतर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच मनोरमा बेपत्ता होती. पोलिसांची काही पथके तिच्या शोधार्थ रवाना करण्यात आली होती.

पोलिसांकडून पाहाटे कारवाई

मनोरमा खेडकर ही महाड येथील एका हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन पोलिसांनी अत्यंत सावधपणे महाड गाठले आणि कारवाई केली. पोलिसांचे एक पथक आज म्हणजेच गुरुवारी (18 जुलै) पहाटेच्या सुमारास हॉटेलवर दाखल झाले. तेथे मनोरमा असल्याची खात्री पटताच थेट कारवाई करण्यात आली. या महिलेला हॉटेलवरच ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. मनोरमा खेडकर यांनी कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांशीही हुज्जत घातली होती. या घटनेचाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. (हेही वाचा, Manorama Khedkar Video: पूजा खेडकर हिच्या आईची पोलिसांशी हुज्जत; जुन्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल)

शेतकऱ्याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

शेतकऱ्याकडून प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी मनोरमा खेडकर हिच्याविरोधात पौंड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पुणे पोलीस बाणेर येथे असलेल्या तिच्या राहत्या घरी पोहोचले होते. मात्र, तिच्या घराला बाहेरुन कुलुप होते. तसेच, खेडकर कुटुंबीयांकडूनही पोलिसांना कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर पोलिसांची तीन पथके तिच्या मागावर रवाना करण्यात आली होती. या प्रकरणात अजूनही काही जणांवर कारवाई होणे बाकी आहे. दरम्यान, महाड येथील एका हॉटेलमधून मनोरमा हीस पोलिसांनी ताब्यात घेतले. तिला अटक झाली असून लवकरच तिस कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. (हेही वाचा, Trainee IAS Pooja Khedkar Case: पूजा खेडकर यांच्या पाथर्डी आणि मुंबईतील घरावर पुणे पोलिसांची छापेमारी, Manorama Khedkar आणि Dilip Khedkar यांचा शोध सुरू)

कुटुंब रंगलय वादात

प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर ही तिच्या अनेक कारनाम्यांमुळे वाद आणि चर्चेत आहे. एका बाजूला प्रशासकीय पातळीवर तिच्यावर कारवाई टांगतील तलवार लटकत आहे. त्यातच तिच्या आईचाही कारनामा पुढे आल्याने एकूण खेडकर कुटुंबच वादात अडकल्याचे चित्र आहे. खेडकर कुटुंबावर विविध वादात अडकल्याची प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियातून जोरदार चर्चा आहे. त्यातच मनोरमा हिच्यावर दखल पात्र गुन्हा दाखल असल्याने पोलीस तिच्या शोधात होते.

(The above story first appeared on LatestLY on Jul 18, 2024 10:55 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).