Manoj Jarange Patil On Maratha Reservation: मराठा आरक्षण मिळवूनच आंदोलन थांबेल, सरकारने चाळे बंद करावेत- मनोज जरांगे पाटील

'देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला यावे. मुख्यममंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Eknath Shinde, Manoj Jarange Patil | (Photo credit: archived, edited, representative image)

Maratha Reservation Updates: राज्य सरकारने काढलेला अध्यादेश आम्हाला मान्य नाही. राज्य सरकारने मराठा समाजाला पूर्ण आरक्षण द्यावे. सुरु झालेले हे आंदोलन समाजाला आरक्षण मिळवूनच थांबेल. राज्य सरकारने आगोदर वेळ दिली. आता पुन्हा म्हणत आहे वेळ वाढवून द्या. सरकारला वेळ वाढवून द्यायची किंवा नाही हे समाजाशी बोलून ठरवेन. पण, वेळ किती द्यायचा आणि वेळ दिला तर आरक्षण देणार का? असा सवाल मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एक सर्वपक्षीय बैठक आजच (1 नोव्हेंबर) पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतरांच्या उपस्थितीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी आरक्षणाच्या सोडवणुसाठी राज्य सरकारला आणखी वेळ हवा आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे, असे अवाहन केले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी उपोषणस्थळावरुन साधलेल्या संवादावेळी जरंगे पाटील बोलत होते.

'सरकार आणि राजकारणी मिळून मराठ्यांना येड्यात काढले'

आम्हाला अर्थवट आरक्षण नको आहे. राज्य सरकारला आता जर वेळ वाढवून पाहिजे आहे तर मग पाठिमागील सात दिवसांपासून आम्ही राज्य सरकारला चर्चेला बोलावतो आहे सरकार का आले नाही? सरकारला आताच वेळ वाढवून का हवा आहे? सरकार आणि राजकारणी मिळून मराठ्यांना येड्यात काढत आहेत. आमची सर्वच पक्षांनी फसवणूक केले. आजही मला कोणताही राजकीय पक्ष नाही. मराठा समाजाला  आरक्षण द्या येवढाच आमचा मुद्दा आहे. राज्य सरकार आरक्षणही देत नाही आणि चर्चेलाही येत नाही. सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये, असे अवानह मनोज जरांगे पाटील यांनी या वेळी केले. राज्य सरकार केवळ कागद दाखवत आहे. कागदं दाखवून आम्हाला फसवू नका असेही ते म्हणाले.

'सरकारने चाळे बंद करावेत, इंटरनेट सुरु करावे'

मराठे शांत आहेत. ते कधीच हिंसक आंदोलन करत नाहीत. पण राज्य सरकार मराठ्यांना बदनाम करत आहे. आंदोलनात फूट पाडायचे पाहात आहे. त्यामुळेच गोरगरीब जनतेवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मराठ्यांनी हिंसा केली नाही. तरीही राज्य सरकारने इंटरनेट बंद केले आहे. राज्य सरकारने हे चाळे बंद करावेत. आम्ही मनात आनले तर यांचा आवाज पाच मिनिटांमध्ये बंद करु शकतो, असा इशाराही जरांगे यांनी या वेळी राज्य सरकारला दिला.

'देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला यावे, मराठे विरोध करणार नाहीत'

राज्य सरकार आंदोलन आणि मराठा समाजाचा अंत पाहते आहे. अनेक ठिकाणी गोरगरीब जनतेवर गुन्हे दाखल करत आहे. हे सर्व अन्याय करणारे आहे. पण काही झाले तरी आंदोलन थांबणार नाही. आम्ही याही आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चर्चेसाठी बोलावले होते. आम्ही त्यांवा विश्वास दिला होता. मराठा समाज देवेंद्र फडणवीस चर्चेला येताना आढवणार नाहीत. पण असे असूनही ते चर्चेला आले नाहीत. अजूनही वेळ गेली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला यावे. राज्य सरकारर्फे कोणीही चर्चेला आले नाही. राज्य सरकारने काय तो निर्णय घ्यावा. तसेही मी आज सायंकाळपासून (1 नोव्हेंबर 2023) पाणी बंद करणार आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. आज उपोषणाचा 7-8 वा दिवस आहे. या कालावधीत जरांगे पाटील यांच्या शरीरात अन्नाचा कणही गेलानाही. या पार्श्वभूमीवर त्यांचे हे विधान महत्त्वाचे आहे.



संबंधित बातम्या