Mango Price in Mumbai City: मुंबई शहरात एक आंबा सुमारे 1800 रुपयांना विकला; जाऊन घ्या 5 डझनांच्या पेटीचा दर
या पेट्यांचा लिलाव करण्यात आला. अंधेरी येथील मॅरीएट येथे 5 मार्चच्या सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला या वेळी उद्योजक राजेश अथायडे यांनी 1 लाख 8 हजार रुपयांना ‘मायको’ ब्रँडची पहिली पेटी खरेदी केली.
अनेकांचे आवडते फळ असलेला आंबा मुंबई बाजारात दाखल झाला आहे. तसेच विक्रिसाठीही उपलब्ध झाला आहे. परंतू, पुढे आलेल्या या माहितीनुसार हा आंबा भलताच महाग आहे. मुंबईत दाखल झालेल्या आंब्याची एक पेटी नुकतीच विकली गेली. या पेटीला 1 लाख 8 हजार इतका भाव आला. त्यानुसार प्रति आंबा दर 1800 रुपये इतका पडला. इतक्या विक्रमी दराने आंबा विकला गेल्याने अनेकांचे तोंड मात्र अंबट झाले आहे. एका पेटीत साधारण पाच डजन आंबा असतात. तर एका डझनमध्ये 12 आंबे.
मुंबई शहरातील अंधेरी येथे ए कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात आंब्याच्या पेट्यांना विक्रमी भाव मिळाल्याचे पाहायला मिळाले. बाबू अवसरे या शेतकऱ्याने हा आंबा विक्रिस ठेवला होता. हापूस जातीचा आंबा पाहून अनेकांनी बोली लावली. अखेर या आंब्यांना 1 लाख 8 हजार इतका दर (प्रतिपेटी) मिळाला. सांगितले जात आहे की, आंब्यांच्या इतिहासात गेल्या शंभर वर्षांमध्ये प्रति पेटी इतका दर कधीच मिळाला नव्हता. आंब्यांच्या इतिहासातला हा विक्रम मानला जात आहे. (हेही वाचा, आंबा खरेदी करताय? फसवणूक टाळण्यासाठी, असा ओळखा कोकणी हापूस)
कोकणातील आंबा बागायतदारांनी मुहूर्ताच्या आंबा पेट्या मुंबई येथे विक्रिसाठी आणल्या होत्या. या पेट्यांचा लिलाव करण्यात आला. अंधेरी येथील मॅरीएट येथे 5 मार्चच्या सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला या वेळी उद्योजक राजेश अथायडे यांनी 1 लाख 8 हजार रुपयांना ‘मायको’ ब्रँडची पहिली पेटी खरेदी केली.
लॉकडाऊन काळात गेल्या वर्षी अनेक आंबा उत्पादकांना जोरदार फटका बसला. लॉकडाऊन असल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प होती. शेतमाल वाहतूकीस परवानगी होती. मात्र, असे असले तरी इतर वाहतूक बंद असल्याने आणि लॉकडाऊन असल्याने मार्केट मात्र बंद होते. त्यामुळे गेल्या वर्षी म्हणावे त्या प्रमाणात आंबा उत्पादकांना आंब्यातून मिळणारे उत्पन्न मिळाले नाही. त्या तुलनेत यंदाही कोरोनाचे सावट कायम असले तरी परिस्थिती सुधारेल अशी आशा आहे.