Mahavikas Aghadi Mahamorcha: महाविकास आघाडी महामोर्चासाठी सज्ज तर मुंबई पोलिसांकडून विशेष नियमावली जारी
या मोर्चाची महाविकास आघाडीसह मित्रपक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सरकार विरुध्दच्या या मोर्चात लाखोंच्या संख्येने गर्दी जमवत प्रदर्शन करण्याचा हेतू विरोधी पक्षांचा आहे.
भाजप नेत्यांसह राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा वारंवार झालेला अपमान त्याचप्रमाणे कर्नाटक सीमावादाचा सुरु असलेला प्रश्न या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने एल्गार पुकारला आहे. या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी उद्या म्हणजेचं 17 डिसेंबर रोजी मुंबईत महामोर्चा काढणार आहे. या मोर्चाची महाविकास आघाडीसह मित्रपक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. सरकार विरुध्दच्या या मोर्चात लाखोंच्या संख्येने गर्दी जमवत प्रदर्शन करण्याचा हेतू विरोधी पक्षांचा आहे. तरी या मोर्चात सर्वसामान्यांनी सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडीकडून विशेष आवाहन करण्यात आले आहे. दक्षिण मुंबईतील भायखळा रिर्चड्सन क्रुडासपासून सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असुण त्यानंतर हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने येणार आहे. तर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या समोर एका ट्रकवरच सभा आयोजित करण्यात येणार आहे.
मुंबई पोलिसांकडून या महामोर्चा संबंधी विशेष सुचना आणि नियमावली जारी करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या अटींनुसार मुंबई पोलिसांनी आखुन दिलेल्या मार्गानुसार मोर्चाचा मार्ग असावा, कुणीही वेळेवर मोर्चाच्या मार्गात बदल करुन नये असं पोलिसांकडून सुचित करण्यात आलं आहे. तर मोर्चादरम्यान फटाके फोडण्यावर तर चाकू, तलवार आणि इतर घातक शस्त्र वापरण्यात बंदी घालण्यात आली आहे. एवढचं नाही तर दोन समाजात तेढ निर्माण होईल किंवा कुठल्याही बाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य करण्याबाबत बंदी घालण्यात आली आहे. (हे ही वाचा:- Pathaan Controversy: हिंदुत्वाचा अपमान करणारा चित्रपट महाराष्ट्रात चालणार नाही; पठाण वादावर भाजप नेते राम कदम यांचा इशारा)
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मोर्चा शांततेत व्हावा असं आवाहन केलं आहे. लोकशाही पद्धतीने कोणाला विरोध करायचा असेल तर ते करतील. कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी, एवढ्यापुरता सरकारचा त्यात हस्तक्षेप असेल. मोर्चाच्या मार्गांसंदर्भात त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितलेला मार्ग मान्य केलेला आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.