युरोपातील सर्वोच्च शिखर Mount Elbrus वर 73 फुटी तिरंगा फडकवत महाराष्ट्रातील '360 एक्सप्लोरर'च्या गिर्यारोहकांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन; टीममध्ये 10 वर्षीय साई कवडे याचाही समावेश

तर टीममधील 10 वर्षीय साई कवडे हा चिमुकला एलब्रूस शिखर सर करणारा आशियातील सर्वात लहान मुलगा ठरला आहे.

360 एक्सप्लोरर (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रासह देशभरात आज (15 ऑगस्ट) 73 व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचं सेलिब्रेशन सुरू आहे. पण याच वेळी महाराष्ट्रातील 5 गिर्यारोहकांनी युरोपातील सर्वोच्च शिखर माऊंट एलब्रुस बेसकॅम्पवर 73 फुटी तिरंगा फडकवत देशाचा 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. 360 एक्सप्लोरर या गिर्यारोहकांच्या टीमने आज अंतिम चढाई करण्यापूर्वी 73 फुटी तिरंगा विदेशात झळकवत नवा विक्रम केला आहे. तर टीममधील 10 वर्षीय साई कवडे हा चिमुकला एलब्रूस शिखर सर करणारा आशियातील सर्वात लहान मुलगा ठरला आहे. Independence Day 2019: स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा फडकवण्यापूर्वी 'हे' नियम लक्षात असू द्या!

10 वर्षीय साई कवडेसह तुषार पवार, भूषण वेताळ, सागर नलावडे, आनंद बनसोडे या गिर्यारोहकांचा यामध्ये समावेश आहे. आनंद बनसोडे यांनी 2014 साली माउंट एलब्रुस सर केले होते. त्यामुळे यंदाचे खेपेस ते मार्गदर्शक म्हणून टीमसोबत होते.

एलब्रूस मोहिमेनंतर 360 एक्सप्लोररचे गिर्यारोहक महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली येथील पूरग्रस्तांना मदत करणार आहेत. आज स्वातंत्र्यदिनाचं सेलिब्रेशन करताना खास मराठमोळा कोल्हापुरी फेटा बांधून तिरंगा एलब्रूस बेसकॅम्प (13000 फूट) वर फडवला आहे.