Maharashtra Weather Update: महाराष्ट्र थंडीने गारठला, गोंदियात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद
गोंदिया पाठोपाठ नागपूर, वर्धा, अमरावती येथील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
Cold Wave in Maharashtra: महाराष्ट्रात तापमानाचा पारा दिवसेंदिवस घसरत चालला आहे. परिणामी संपूर्ण महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली आहे. दरम्यान 20 जानेवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे. मात्र त्याआधीच वातावरणात गारवा आला असून महाराष्ट्र थंडीने गारठला आहे. मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा चांगलाच घसरला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गोंदिया पाठोपाठ नागपूर, वर्धा, अमरावती येथील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.हेदेखील वाचा- Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात 20 जानेवारीपासून पुन्हा येणार थंडीची लाट, नाशिकचा पारा 12 अंशाच्या खाली जाण्याची शक्यता- IMD
पाहूयात महाराष्ट्राती महत्त्वाच्या जिल्ह्यातील आजचे (17 जानेवारी) किमान तापमान
सांताक्रूज- 18.2
कुलाबा- 20.6
पुणे- 16.7
ठाणे-19.0
माथेरान- 19.0
गोंदिया- 11.5
नागपूर- 13.4
वर्धा- 14.2
रत्नागिरी- 19.8
पणजी-23.8
परभणी-18.1
कोल्हापूर- 20.8
बारामती- 17.9
नाशिक-16.4
महाबळेश्वर-16.6
तसेच येत्या 22 जानेवारीनंतर मुंबईतील तापमान 16 अंश सेल्सियसच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता आहे. अशा कडाक्याची थंडीत नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी आणि स्वत:चे थंडीत होणा-या आजारांपासून रक्षण करावे असे आवाहन हवामान विभागाकडून केले जात आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या 22,23 जानेवारीला पुणे, नाशिकचा पारा हा 12 अंशाच्या खाली जाण्याची शक्यता वर्तविली आहे. तर किमान तापमानात घट होऊन मुंबईतील कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.