Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचं संकंट, हवामान विभागाने दिला ईशारा
महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीच्या दिवसांत अवकाळी पावसाचं संकट येणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
Maharashtra Weather: महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीच्या दिवसांत अवकाळी पावसाचं संकट येणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढली आहे. देशातील काही राज्यात कडाक्याची थंडी आहे. उत्तर भारतात थंडीचा जोर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील विदर्भात येत्या काही दिवसात थंडी आणखी वाढणार आहे. पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार आहे. कोकणासह गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसंच विदर्भामध्ये तापमानात काही प्रमाणात घत होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा- ढगाळ वातावरणामुळे राज्यातील थंडी गायब पण नवीन वर्षात कडाका वाढण्याची शक्यता)
विदर्भात येत्या काही दिवसांत हलक्या पावसाची शक्यता असणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे. पुढील दोन दिवसांत गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
महाराष्ट्रात पुणे, मुंबई, जळगाव, नाशिक जिल्ह्यात थंडी वाढली आहे. पुणे भागात किमान तापमान २ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असल्याने थंडीत वाढ होणार आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने इथेही थंडीचा पार वाढला आहे. राज्यात सर्वाधित कमी किमान तापमानाची नोंद जळगावात ११ अंश सेल्सिअस झाली आहे. तर पुण्यामध्ये १३.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.