Weather News : राज्यात थंडी शेवटच्या टप्प्यात, उन्हाच्या झळा तीव्र; वाशिममध्ये सर्वाधिक ३८ अंश सेल्सिअसची नोंद

सर्वच भागांमध्ये कमाल तापमानाच्या नोंदी वाढत आहेत. गुरूवारी सर्वाधिक तापमानाची नोंद वाशिममध्ये करण्यात आली.

Summer Advisory By Health Ministry

Maharashtra Weather : मध्यंतरीच्या काळात राज्यात थंडी कमी (winter) झाली होती. तेव्हा थंडी गायब होणार असं वाटत असतानाच, राज्यात अचानक तापमान कमी (Maharashtra Weather update) झालं आणि हिवाळा काही काळ वाढला. आता मोठ्या मुक्कामी असणारी थंडी शेवटच्या टप्प्यात आल्याची चिन्ह निर्माण होऊ लागली आहेत. कारण, सध्या उन्हाची तीव्रता (Summer wave) अपेक्षेहून जास्त जाणवू लागली आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये आता तामपानात वाढ होत आहे. किनारपट्टी भागांमध्येही हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढताना दिसत आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला गेल्या पंधरा दिवसांत अवकाळीने अक्षरश: धूऊन काढले आहे. झालेल्या गारपीटीमुळं हवामानात सातत्यानं काही बदल दिसून आले. तरीही दुपारच्या वेळी उन्हाचा दाह होताच. काल वाशिममध्ये ३८ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद झाली. तर, बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३५ अंशांहून अधिकच असल्याचं पाहायला मिळत आहे.(हेही वाचा:Maharashtra Weather Update: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचे ढग, तापमानवाढीमुळे ऊन्हाचे चटके; जाणून घ्या हवामानाचा अंदाज)

पुण्यात कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांपार गेल्याची नोंद गुरूवारी करण्यात आली. किमान तापमानात वाढ होत असली तरी पहाटे गारठा टिकून आहे. आज (ता. ८) राज्याच्या तापमानात वाढ होत उन्हाची ताप वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भापासून कर्नाटकापर्यंत सक्रिय असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्याच्या अनेक भागांमध्ये अंशत: ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. पण, तरीही उकाडा मात्र जीवाची काहिली करणार आहेच. सध्या कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्येही उन्हाळा आणखी तीव्र होत असल्यामुळं दुपारच्या वेळी काम नसल्यास नागरिक घराबाहेर पडताना दिसत नाहीयेत. घरी पंख्याखाली त्यांनी आसरा घेत आहेत.(हेही वाचा:Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचं संकंट, हवामान विभागाने दिला ईशारा )

२४ तासांत नोंदवलेले तापमान

पुणे ३७.० (११.३), धुळे ३५.० (१०.४), जळगाव ३४.८ (१४.९), कोल्हापूर ३५.४ (१७.६), महाबळेश्वर २९.६ (१५.९), मालेगाव ३७.८ (१६.४), नाशिक ३२.८ (१४.१), निफाड ३२.८ (९.०), सांगली ३६.४ (१७.४), सातारा ३४.७ (१२.९), सोलापूर ३८.६ (२१.२), सांताक्रूझ ३२.२ (१९.०), डहाणू २९.३ (१६.९), रत्नागिरी ३२.२ (१६.८), छत्रपती संभाजीनगर ३४.४ (१७.२), नांदेड ३६.२ (१९.६), परभणी ३७.६ (१९.१), अकोला ३७.५ (१७.३), अमरावती ३६.० (१७.८), बुलढाणा ३५.४ (१७.८), ब्रह्मपूरी ३७.८ (२०.०) चंद्रपूर ३७.८ (२०.०), गडचिरोली ३५.० (१९.२), गोंदिया ३५.२ (१८.८), नागपूर ३६.६ (१९.५), वर्धा ३७.५ (२०.२), वाशीम ३८.८ (१५.२), यवतमाळ ३७.५ (१७.५).