Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील 3-4 दिवसात काही भागात मुसळधार पावसाचा इशारा
ऐन हिवाळ्यात अचानक पावसाचे आगमन झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.
येत्या 12 जानेवारीपर्यंत राज्यात पावसाची अशीच स्थिती (Maharashtra Rain Alert) राहिल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रब्बी हंगामात अवकाळीचं संकट तयार झाल्याने शेतकऱ्यांच्या (Farmer) चिंतेत वाढ झाली आहे. हवामान खात्याने पुढील 24 तासांत पावसाचा इशारा (Heavy Rain) दिला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस अवकाळी पाऊस पाठ सोडण्याची शक्यता कमीच आहे. आज जानेवारीला महाराष्ट्र (Maharashtra) आणि गुजरातमधील (Gujrat) काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाची शक्यता आहे. (हेही वाचा - Mumbai Rains: मुंबईला अवकाळी पावसाचा तडाखा; अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी (Watch Video))
देशात सध्या तमिळनाडू, राजस्थान, केरळ, पश्चिम मध्यप्रदेश, पूर्व राजस्थान दक्षिण कर्नाटक, लक्षद्वीप या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्यात मराठवाड्यासह विदर्भ, कोकण भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर गोवा, पूर्व मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, चंदीगड, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, लडाख, पश्चिम राजस्थान या भागांत देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.
मंगळवारी रात्री मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. ऐन हिवाळ्यात अचानक पावसाचे आगमन झाल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. सोशल मिडियावर अनेक युजर्सनी मुंबईमधील अवकाळी पावसाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.