Maharashtra Weather Forecast: विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात 16-18 फेब्रुवारी दरम्यान वीजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
महाराष्ट्रात 16 फेब्रुवारीपासून 18 फेब्रुवारीपर्यंत विदर्भ, मराठावाडा, मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ऐन थंडीच्या दिवसामध्ये गारवा कमी होऊन तापमान वाढलं आहे. सध्या अरबी समुद्रामध्ये पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अशी स्थिती निर्माण झाली आहे. पण यामुळे महाराष्ट्रात पुन्हा वीजांच्या कडकडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात 16 फेब्रुवारीपासून 18 फेब्रुवारीपर्यंत विदर्भ, मराठावाडा, मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Maharashtra Weather Forecast: फेब्रुवारी महिन्यात राज्यात अनुभवायला मिळणार पावसाळी वातावरण; कोकण, पश्चिम, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आता उत्तर भारतातून वाहणारे थंड वार्याचे प्रवाह थांबले आहेत. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात उष्ण वारे वाहत आहेत परिणामी आता राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानामध्ये वाढ झाली आहे. मुंबई मध्ये आजचं तापमान 20 अंश आहे तर पुण्याचं तापमान 14 अंश सेल्सियस आज सकाळी नोंदवण्यात आलं आहे.
महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर मुंबईचं तापमान सरासरी पेक्षा जास्त आहे. रत्नागिरी आणि अलिबाग मध्ये मात्र तापमानाचा पारा सरासरी पेक्षा कमी नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या परिसरात पावसाचा वीजांचा कडकडाटासह पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे. शेतकर्यांनी या पावसाच्या अंदाजानुसार त्यांच्या कामांचं नियोजन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.