Maharashtra Election Results 2019 News18 लोकमत Live Streaming: कोणत्या पक्षाला मिळणार बहुमत? निवडणूकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार नव्या सरकारची सत्ता, येथे पहा लाइव्ह अपडेट्स
तत्पूर्वी निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राजकरण्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे दिसून आले. तसेच यंदा आपली सत्ता स्थापन व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आला
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी 288 जागांसाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडले. तत्पूर्वी निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राजकरण्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे दिसून आले. तसेच यंदा आपली सत्ता स्थापन व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी शक्तीप्रदर्शन सुद्धा मोठ्या प्रमाणात करणयाात आले. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुती विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांची चांगलीच टक्कर मतांमध्ये होताना दिसून येणार आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019 चे सारे अपडेट्स येथे पहा.
तर News18-Ipsos च्या एक्झिट पोलनुसार, सत्तेच्या चाव्या पुन्हा भाजपा- शिवसेना युतीच्या हातामध्ये पडण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपा- युतीला सर्वाधिक म्हणजे 243 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज विधानसभा निवडणूकीसाठी निकाल जाहीर करण्यात येणार असून कोणती सत्ता स्थापन होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीसाठी भाजप-शिवसेना युतीला आपली पुन्हा सत्ता येईल अशी अपेक्षा आहे. पण विरोधी पक्ष काँग्रेस कडून एनडीचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केला होता. विधानसभा निवडणूकीच्या निकालाचे News18 लोकमतचे लाईव्ह अपडेट्स तुम्ही येथे पाहू शकता.
2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालामध्ये भाजपला सर्वाधिक 122 जागा, शिवसेनेला 63, काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या होत्या. राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल 24 ऑक्टोबर दिवशी लागणार आहे. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी 145 चा आकडा कोण गाठणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.