Maharashtra Election Results 2019 Abp Majha Live Streaming: महाराष्ट्राच्या जनमताचा कौल अखेर कोणाला? येथे पाहा निकालाचे लाईव्ह अपडेट्स

त्यामुळे त्या प्रत्येक क्षणाची इत्यंभूत माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी येथे पाहा विधानसभा निवडणूकीचे सर्व अपडेट्स

Maharashtra Assembly Election Results 2019 (Photo Credits: File)

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2019: गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर अखेर 21 ऑक्टोबरला मतदारराजाने मतदान करुन आपला निर्णय EVM मशीनमध्ये नोंदवला. आता सर्वांची उत्सुकता लागलीय ती निकालाकडे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आणि राज्यात कोणाच्या हाती सत्ता येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळतील. विधानसभेची निवडणूक प्रक्रिया ही एकाच टप्प्यात झाली असून राज्यात 288 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पाडली. सर्वच पक्षांनी केलेल्या प्रचाराचे स्वरुप पाहता हा निकाल खूपच अटीतटीचा असणार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हळूहळू आपल्याकडे एक मतदारसंघाचे निकाल आपल्याकडे येतच राहतील.

राज्यातही पुन्हा भाजप सत्ता येणार की काँग्रेस पक्ष हे चित्र बदलणार हे पाहणे सर्व जनतेसाठी औत्सुक्याचे असणार आहे. त्यामुळे त्या प्रत्येक क्षणाची इत्यंभूत माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी येथे पाहा विधानसभा निवडणूकीचे सर्व अपडेट्स:

ABP Majha च्या खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही विधानसभा निकालाचे लाइव्ह अपडेट्स पाहू शकता.

एबीपी माझा आणि सी वोटरच्या एक्झिट पोल नुसार 192 ते 216 जागांवर महायुती म्हणजेच शिवसेना (Shivsena) भाजपा (BJP) निवडून येईल. तसेच काँग्रेस (Congress)- राष्ट्रवादी (NCP) आघाडीला 55 ते 81 जागा व इतर पक्षांना 4 ते 21 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तसेच त्यांनी एक्झिट पोल मध्ये दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबईतून महायुतीला सर्वाधिक जागा मिळवता येऊ शकते. तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना- भाजपा युती आणि काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी यांच्यात मतांची तफावत अगदी कमी असू शकते. राज्यात एकूणच इतर पक्ष जसे की, मनसे, वंचित बहुजन आघाडी किंवा रिपब्लिक परतीचे भवितव्य एबीपीच्या नुसार तरी धोक्यात असल्याचे दिसून येत होते.

Maharashtra Assembly Elections 2019 ABP Majha C Voter Exit Poll Results: महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता येणार? पहा जागांची आकडेवारी

मात्र हा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरणार की जनमताचा कौल काही वेगळंच चित्र निर्माण करणार हे लवकरच स्पष्ट होईल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif