Ganeshotsav 2022: यंदा विविध देशातील महावणिज्य दूतांना पर्यटन विभागाच्या वतीने मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पाचं दर्शन, राज्य शासनाचा अनोखा उपक्रम
यंदा मुंबईमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या देशातील महावणिज्य दूत यांना पर्यटन विभागाच्या वतीने मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पाचं दर्शन करवण्यात येणार आहे.
मुंबईचा गणेशोत्सव (Mumbai Ganpati Festival) देशात भारी नाही तर जगात भारी अशी ख्याती आहे. परदेशातून विविध पर्यटक (Tourist) भारतात (India) मुंबईतील (Mumbai) गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) आनंद लुटण्यासाठी येतात. बाप्पाचे फक्त भारतातचं (India) नाही तर परदेशातही (International) मोठे भक्त आहेत. ऑस्ट्रेलिया (Australia), अमेरिका (America), जर्मनी (Germany) अशा विविध देशात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येते पण शेवटी मायदेशातला गणेशोत्सव काही निराळाचं. परदेशात मुंबईतील (Mumbai) गणेशोत्सवाचं विशेष आकर्षण आहे. याचं पार्श्वभुमिवर राज्य शासनाकडून (Maharashtra Government) यावर्षी गणेशोत्यवा दरम्यान एक नवा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.यंदा मुंबईमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या देशातील महावणिज्य दूत (Consular Generals of various countries) यांना पर्यटन विभागाच्या वतीने मुंबईतील प्रसिद्ध गणपती बाप्पाचं दर्शन करवण्यात येणार आहे. पर्यटन विभागाकडून (MTDC) या उपक्रमाची सुरुवात आजपासून म्हणजे 2 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर करण्यात येणार आहे.
या उपक्रमातून परदेशातील नागरिकांपर्यंत (International Citizen) गणेशोत्सवाबाबत (Ganeshotsav) अधिक माहिती पोहोचवण्याचा आणि या उपक्रमाला पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असल्याची उद्देश राज्य पर्यटन विभागाकडून (MTDC) स्पष्ट करण्यात आला आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये (Shinde Fadnavis Government) यावर्षी या उपक्रमाचं पहिलं वर्ष आहे तरी राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) स्वतः लालबागचा राजाचं (Lal Baug Cha Raja) दर्शन घेते वेळी सर्व शिष्टमंडळासोबत उपस्थित राहणार आहेत. (हे ही वाचा:- Lalbaugcha Raja 2022 : 'लालबागच्या राजाच्या नवसाच्या रांगेत बसण्याची व्यवस्था करा' दिवंगत लेकीची शेवटची आठवण शेअर करणारं माऊली चं जीवाला चटका लावणारं पत्र वायरल!)
राज्याच्या पर्यटनासह (Maharashtra Tourism) संस्कृतीला (Maharashtrian Tradition) वाव देण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात असल्याची माहिती एमटीडीसी कडून देण्यात आली आहे. या उपक्रमात लालबागचा राजा, गिरगावचा राजा (Girgaon Cha Raja), चिंचपोकळीचा चिंतामणी (Chinchpokli Cha Chintamani), तेजुकाय मेन्शन गणपती (Tejukay Mension Ganpati), खेतवाडीचा महाराजा (Khetwadi Cha Raja), परळचा राजा (Parel Cha Raja), माटुंगाच्या जीएसबी गणपती(Matunga Cha JSB) अशा विविध सुप्रसिध्द बाप्पाचं दर्शन महावणिज्य दूतांना करवण्यात येणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)