Maharashtra: पुण्यात चोरट्यांनी स्फोटकांच्या सहाय्याने फोडले एटीएम मशीन, पळवली 16 लाखांची रोकड
जवळजवळ 16 लाख रुपये घेऊन चोरच्यांनी पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Maharashtra: महाराष्ट्रातील पुण्यात रविवारी चोरट्यांनी विस्फोटकांचा वापर करुन एका बँकेचे एटीएम तोडल्याचा प्रकार घडला आहे. जवळजवळ 16 लाख रुपये घेऊन चोरच्यांनी पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांचे डीसीपी मंचक इप्पर यांनी असे म्हटले की, पुणे शहरातील आळंदी शहराजवळ काही लोकांनी जिलेटीनच्या काड्यांच्या सहय्याने एका खासगी बँकेच्या एटीएम मध्ये स्फोट केला. त्यानंतर पैसे चोरले. घटनेची माहिती मिळताच बीडीडीएससह एक तांत्रिक टीम घटनास्थळी पोहतच तपास सुरु केला.
पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. परंतु चोरट्यांची ओळख पटलेली नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.(Mumbai: दोन तरुणांचे अपहरण आणि दरोड्याच्या संशयावरून नग्न परेड केल्याप्रकरणी 2 पोलिसांना अटक)
Tweet:
यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारची घटना घडली आहे. त्यामध्ये एक एटीएम मध्ये स्फोट करुन त्यामधील पैसे चोरी केले होते. जुलै मध्ये एमआयडीसी परिसरात एक एटीएममधून चोरांनी 28 लाख रुपयांची चोरी केली होती.