COVID-19 Cases in Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार! मागील 24 तासांत आढळले 58,993 नवे कोरोनाचे रुग्ण
यासह राज्यात आतापर्यंत 26 लाख 95 हजार 148 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे
महाराष्ट्रात (Coronavirus in Maharashtra) कोरोनाची दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा दुप्पट वेगाने आली आहे. महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मागील 24 तासांत 58,993 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 301 रुग्ण दगावले आहेत. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 32 लाख 88 हजार 540 वर (COVID-19 Cases) पोहोचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 57,329 वर पोहोचला आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक आहे. राज्यात सद्य घडीला 5 लाख 34 हजार 603 रुग्णांवर (COVID-19 Active Cases) उपचार सुरु आहेत.
महाराष्ट्रात मागील 24 तासांत 45,391 रुग्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यासह राज्यात आतापर्यंत 26 लाख 95 हजार 148 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.हेदेखील वाचा- COVID-19 Cases in Mumbai: मुंबईत आज 9200 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 898 वर
राज्यात आज बरे झालेल्या रुग्णांचा दर 81.96% इतका आहे. सद्य घडीला राज्यात 26 लाख 95 हजार 65 रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून 24,157 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
दरम्यान मुंबईत आज दिवसभरात 5099 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 3,97,613 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. मुंबईत आज एकूण 55,741 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून 45 लाख 9 हजार 881 रुग्णांनी कोरोनाचे नमुने घेण्यात आले आहेत.
राज्यातील कोरोना विषाणूची (Coronavirus) चिंताजनक परिस्थिती पाहता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी उद्या सर्व पक्षांची बैठक बोलावली आहे. न्यूज 18 च्या सूत्रांच्या माहितीनुसार, ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार आहे. बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांचा सल्ला घेत संपूर्ण महाराष्ट्रातील निर्बंध तसेच लॉकडाऊनबाबत चर्चा केली जाईल. यासंदर्भात विरोधीपक्ष नेत्यांची मतेही जाणून घेतली जातील. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित राज्य, महाराष्ट्रामध्ये सध्या सर्व जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू सुरू आहे.