Maharashtra Rains Update: पुणे,साता-यासह मध्य महाराष्ट्रात आज वादळी वा-यासह पावसाची शक्यता, तर उद्यापासून पाऊस परतीच्या वाटेवर- IMD
त्यासोबत पावसाचा जोर हळूहळू कमी होणार पुढील 2-3 दिवसांत महाराष्ट्रातून पाऊस नाहीसा होणार आहे असेही हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.
परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सळो की पळो करून सोडले. या पावसाने अनेकांच्या शेतीचे, पिकांचे, फळबागांचे, घरांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. मात्र गेल्या 2 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून हळूहळू आपला मुक्काम संपवून परतीच्या प्रवासाला निघणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पुणे (Pune), सातारा (Satara), कोल्हापूर (Kolhapur) आणि मध्य महाराष्ट्राच्या (Madhya Maharashtra) काही भागात वादळी वा-यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर उद्या मात्र पावसाचा हा जोर कमी झालेला दिसणार आहे असेही सांगण्यात येत आहे.
त्यासोबत पावसाचा जोर हळूहळू कमी होणार पुढील 2-3 दिवसांत महाराष्ट्रातून पाऊस नाहीसा होणार आहे असेही हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. Maharashtra Monsoon Update: पुढील 2 दिवसात महाराष्ट्रातून पाऊस माघार घेण्याची शक्यता, येत्या 48 तासांत उत्तरेकडून पाऊस परतीच्या वाटेवर- IMD
के एस होसाळीकर यांचे ट्विट:
राज्यात काही भागात थंडीची चाहूल लागली असून काही भागात परतीच्या अनिश्चित पावसामुळे उकाडा जाणवत आहे. मुंबईतही उकाडा आणि थोडासा गारवा असा खेळ सुरु आहे. मात्र काही दिवसांतच पावसाची राज्यातून एक्झिट होऊन छान थंडी पडायला सुरुवात होईल.
यंदा पाऊस अपेक्षेपेक्षा जास्त चांगला पडल्याने तितकची चांगली थंडी यंदा संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबईला अनुभवता येण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.