Record Break Rain in Solapur: सोलापूर जिल्ह्यात 12 तासात रेकॉर्ड ब्रेक; बार्शी तालुक्यात विक्रमी 140 मिमी पाऊस, अनेक ठिकाणी अतवृष्टी

अचाकन कोसळलेल्या आणि अतिवृष्टी म्हणवी इतक्या मुसळदार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. नागरी भागात अनेके घरांचे, दुकानांचे नुकसान झाले. काही कार्यालयं आणि इतर इमारतींनाही पावसाचा मोठा फटका बसला. पावसाचा जोर इतका होता की नागरिकांना आहे त्या ठिकाणीच बराच काळ स्थानबद्ध रहावे लागले.

Record Break Rain in Solapur: सोलापूर जिल्ह्यात 12 तासात रेकॉर्ड ब्रेक;  बार्शी तालुक्यात  विक्रमी 140 मिमी पाऊस, अनेक ठिकाणी अतवृष्टी
Rain | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Maharashtra Rains Update: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी पाहायला मिळत आहे. दरम्यान, दुष्काळी जिल्हा असी गेल्या अनेक वर्षांची ओळख असलेल्या सोलापूर (Solapur Rains Update) जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद (Rain in Barshi) झाली आहे. बुधवारी (14 ऑक्टोब) पहाटे 3 ते दुपारी 3 या कालावधीत बार्शी तालुक्यात अतिवृष्टी झाली. या कालावधीत तालुक्यात सरासरी 150 मिमी पेक्षाही अधिक पाऊस पडला. विशेष म्हणजे बार्शी (Barshi Taluka) तालुक्यातील सर्वच्या सर्व 10 महसूल मंडळात या पावसाची नोंद झाली. संपूर्ण तालुक्यात मिळून सरासरी 1404 मिमी इतका पाऊस नोंदला गेला. तालुक्याच्या इतिहासात गेल्या 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच इतक्या पावसाची नोंद झाली आहे. (Record Break Rain in Solapur)

अचाकन कोसळलेल्या आणि अतिवृष्टी म्हणवी इतक्या मुसळदार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. नागरी भागात अनेके घरांचे, दुकानांचे नुकसान झाले. काही कार्यालयं आणि इतर इमारतींनाही पावसाचा मोठा फटका बसला. पावसाचा जोर इतका होता की नागरिकांना आहे त्या ठिकाणीच बराच काळ स्थानबद्ध रहावे लागले. (हेही वाचा, Maharashtra Weather Forecast: हवामान खात्याचा मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग ला ऑरेंज अलर्ट तर रायगड, रत्नागिरी साठी रेड अलर्ट; 24 तास अति मुसळधार पावसाचा इशारा)

बार्शी तालुका मंडळ निहाय पडलेला पाऊस

बार्शी- 158, अगळगाव- 65, वैराग- 168, पानगाव- 165, सुर्डी- 149,गौडगाव- 155, पांगरी- 122, नारी- 160, उपळे दु.- 110, खांडवी- 152. तालुक्यात एकूण 1404 मि. मि. पावसाची नोंद झाली. तालुक्यात सरासरी 140.4 मि. मि. इतका पाऊस पडला.

कमी काळात अधिक पाऊस पडल्याने अगदी अत्यल्प काळात ओढे, नद्या, नाले यांना पूर आला. डोंगरावरील नाल्यांतून ओहोळ वाहू लागले. बंधारे, तलाव तुडंब झाले. विशेष म्हणजे बार्शी शहरातील मुख्य चौकातही जवळपास 3 फूट इतके पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.

(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2020 01:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).