Maharashtra Rains: राज्यात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू; 838 घरांचे नुकसान, 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले

भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांत महाराष्ट्र आणि मुंबई राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. IMD ने मुंबईत पावसाबाबत रेड अलर्ट जारी केला आहे.

पूर | प्रातिनिधिक प्रतिमा | (Photo Credits: ANI)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rains) पडत आहे. मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अशात महाराष्ट्रात पावसामुळे 76 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा हा आकडा 1 जून ते 7 जुलैपर्यंतचा आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने ही माहिती दिली आहे. यापैकी गेल्या 24 तासांत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे महाराष्ट्रात 838 घरांचे नुकसान झाले असून 4916 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

याशिवाय 125 जनावरेही पावसामुळे दगावली आहेत. पूरग्रस्तांसाठी राज्यात 35 मदत शिबिरे उभारण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे किमान 130 गावे बाधित झाली असून 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही दिलासादायक बाब आहे की, आतापर्यंत या ठिकाणाहून जीवितहानी झालेली नाही. मात्र मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

मुसळधार पावसामुळे पूर्व महाराष्ट्रातील गडचिरोलीतील 128 गावांचा संपर्क तुटला आहे. राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने शनिवारी जारी केलेल्या बुलेटिननुसार, गडचिरोलीशिवाय मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतही शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात शनिवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या 24 तासांत 150 मिमी पावसाची नोंद झाली आहे. (हेही वाचा: रत्नागिरीत पूराची चेतावणी देणारी अलर्ट यंत्रणा बसवली, 'अशाप्रकारे' मिळणार माहिती)

हिंगोली जिल्ह्यातील दोन गावे आणि आसना नदीच्या काठावर वसलेल्या शेजारील नांदेड जिल्ह्यातील हदगाव गावांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांत महाराष्ट्र आणि मुंबई राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. IMD ने मुंबईत पावसाबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. यासोबतच महाराष्ट्रात 10 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान लोकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement