Maharashtra Rain: राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता तर विदर्भात येलो अलर्ट जारी

विदर्भासह मराठवाड्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Rains | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

विदर्भासह (Vidarbh) मराठवाड्यात (Marathwada) काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी प्रशासनाकडून विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. आपतकालीन भागात एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या दाखल करण्यात आल्या आहेत. विदर्भातील नागपूर (Nagpur), वर्धा (Wardha), चंद्रपूर (Chandrapur), यवतमाळसह (Yavatmal) अमरावती (Amravati) जिल्ह्यात  येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. तरी प्रशासनाकडून पुन्हा एकदा जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच  मराठवाडासह (Marathwada) राज्यातील इतर भागातही तुरळक पावसाची शक्यता  आहे. मराठवाडा आणि विदर्भात (Vidarbha) या भागात गेल्या महिन्या झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे.

 

मराठवाड्यातील हिंगोली (Hingoli), नांदेड (Nanded) तर पश्चिम महााष्ट्रातील (Western Maharashtra) सोलापूर (Solapur) जिल्ह्यात आज यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.  मुंबईसह (Mumbai) उपनगरात देखील पावसाची रिपरिप बघायला मिळत आहे. हवामान विभागाकडून तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईसह ठाणे (Thane) परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. पहाटेपासूनच मुंबईत पावासाला सुरुवात झाली आहे. गेले काही दिवसात पावसाने उसंत घेतली असली तरी वरुण राजा पुन्हा एकदा राज्यात दमदार हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.(हे ही वाचा:-स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रम राबविण्यात देशात महाराष्ट्र पहिल्या स्थानी; पुणे जिल्ह्याची सर्वोत्तम कामगिरी)

 

28 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट (August) दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या 48 तासांसाठी राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तरी वरुणराजा अजुन परतला नाही आणि सप्टेंबरमध्ये पावसाची शक्यता नाकारता येणार नाही असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.